spot_img
Thursday, September 19, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

पाणी गरम करण्यासाठी गीझर वापरताय? तर नक्की वाचा

सध्याच्या काळात आपण पाहू शकतो की आधुनिकीकरणामुळे अनेक घरांमध्ये पाणी गरम करण्यासाठी गिझरचा (Geyser) वापर केला जातो. पूर्वीच्या काळी पाणी गरम करण्यासाठी चुलीचा किंवा गॅस आणि शेगडीचा वापर केला जायचा. पण आता पाणी तापवण्यासाठी गिजर जास्त सोयीस्कर पडतो. त्यात मेहनत आणि वेळ दोन्हीही गोष्टी वाचतात. तसे तर तंत्रज्ञानामुळे अनेक गोष्टी सोप्या झाल्या आहेत आणि सुरक्षित देखील झाल्या आहेत. पण तंत्रज्ञानाचा योग्य वापर आणि योग्य सांभाळ केला गेला नाही तर ते तुमच्या जीवावर देखील बेतू शकत.त्याच प्रमाणे गिझर (Geyser) वापरताना देखील काही गोष्टींची खबरदारी बाळगली पाहीजे. नाहीतर ते तुमच्या जीवावर देखील बेतू शकेल. आता आम्ही तुम्हाला या संदर्भातील काही खास माहिती सांगणार आहोत.

पाणी गरम करण्यासाठी वापरले जाणारे सर्वात आधुनिक तंत्रज्ञान म्हणजेच गिझर. हे वापरण्यास जेवढे सोपे आहे, तेवढाच त्याचा सांभाळ करणं देखील कठीण आहे. कारण गिझरला (Geyser) जास्त वेळ वापरले तर गिझरमध्ये (Geyser) स्फोट घडण्याची शक्यता असते. म्हणूनच जर घरामध्ये एखाद्या जरी व्यक्तीकडून गिझर (Geyser) सुरु राहिला तर त्याचे दुष्परिणाम हे संपूर्ण कुटुंबाला भोगावे लागू शकतात. गिझर सुरु राहिल्यात गिझरमधील बॉयलरवर टॅन पडतो आणि त्यामुळे गिझरमध्ये (Geyser) लिकेजची समस्या निर्माण होते. म्हणजेच की गिझरमधून करंट लीक होण्यास सुरुवात होते. यामुळेच अंघोळ करणाऱ्या व्यक्तीचा मृत्यू देखील होऊ शकतो. तसेच गिझरमध्ये स्वयंचलित कोईल , सेन्सर्स असतात. जर या सेन्सर्सनी काम करण बंद केले तर गिझरमध्ये स्फोट घडू शकतो. म्हणूनच यासाठी आंघोळ करताना गिझर बंद आहे ना याची खबरदारी घेणे आवश्यक आहे तसेच आंघोळ करण्यापूर्वी पाणी सुरु केल्यानंतर गिझर लावणे आवश्यक आहे.

गिझर (Geyser) खरेदी करताना नीट सर्व गोष्टी तपासून घ्याव्यात. तसेच गिझरचे रेटिंग सुद्धा पाहावे आणि गीझर भिंतीला अगदीच चिकटून लावू नये. भिंत आणि गीझरमध्ये थोडेफार अंतर ठेवावे.तसेच चांगल्या दर्जाचे आणि ब्रँडचेच हीटर निवडा आणि गीझरची वेळोवेळी देखभाल दुरुस्ती करत रहावी.

हे ही वाचा:

शिवसेना कुणाची कुणाची? शिंदे आणि ठाकरे गटाने दिल्या प्रतिक्रिया

शिवसेना कुणाची कुणाची? शिंदे आणि ठाकरे गटाने दिल्या प्रतिक्रिया

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss