दातदुखी पासून सुटका हवी आहे ?तर करा हे घरगुती उपाय

दातदुखी पासून सुटका हवी आहे ?तर करा हे घरगुती उपाय

दातदुखी त्रास झाल्यास माणस खूप त्रस्त होतात. दातदुखी ही समस्या वाटे लहान पण ती समस्या खूप गंभीर असते. दातदुखी ही समस्या किती गंभीर आहे हे केवळ तो त्रास सहन करणारी व्यक्तीच समजू शकते. तसेच कोणतेही कडक पदार्थ खाल्याने किंवा गोड पदार्थ खाल्याने दातदुखीची समस्या उद्भवते. दातदुखी झाल्यास खाणे,पिणे देखील कठीण होऊन जाते. कधी कधी असे होते की दातदुखीची वेदना इतकी तीव्र होते की तोंडाला सुजण येते. तसेच दातात बॅक्टेरिया, इन्फेक्शनमुळेही होऊ शकते. आणि रक्तवाहिनी देखील होऊ शकते. तर चला जाणून घेऊया दातदुखीवर घरगुती उपाय.

हे ही वाचा :  Constipation : बद्धकोष्ठता दूर होण्यासाठी घरगुती उपाय

 

दातदुखी असेल तर तुम्ही कापसाच्या मदतीने लवंग तेल वापरावे. किंवा तुम्ही दातांमध्ये लवंग देखील ठेऊ शकता.

आल्याची पावडर आणि पाणी एकत्र करून त्याची पेस्ट करून घ्यावी आणि ती जिकडे दातदुखी आहे तिकडे ती पावडर लावावी.

थोडे हिंग घ्या आणि त्यात पाणी मिक्स करून पेस्ट करून घ्या मग ती पेस्ट दातदुखी आहे त्या जागी कापसाच्या मदतीने लावा.

दातदुखीमुळे तोंडाला सूज आली असेल तर १५ मिनिटे बर्फाचा शेक घ्या त्या जागी सूज कमी होईल.

 

गरम कोमट पाण्यामध्ये मीठ मिक्सकरून त्या पाण्याचा गुळण्या करा. त्यामुळे दातदुखी कमी होईल.

लसणाच्या पाकळ्या चांगल्या बारीक वाटून घ्या आणि त्यात थोडे मीठ मिक्सकरा आणि दातदुखीच्या ठिकाणी लावणे. लगेच फरक जाणवेल. कारण लसणामध्ये भरपूर प्रमाणात औषधी गुणधर्म आहेत. तसेच लसूण आरोग्यासाठी देखील उत्तम आहे.

पाण्यात थोडा कापूस डुबून घ्या आणि त्यावर थोडा बेकिंग सोडा लावून घ्या. आणि जिकडे दात दुखते त्या जागी लावा असे दिवसातून ३-४ वेळा करणे. यामुळे दातदुखीच्या वेदना कमी होतील.

एका वाटी मध्ये दालचिनी घ्या आणि त्यात थोडे मध मिक्सकरा आणि मिश्रण एकत्रित करून घ्या आणि ते मिश्रण दातदुखीच्या जागी लावा. त्यामुळे दातदुखी कमी होईल नि तुमाला लगेच फरक जाणवेल.

हे ही वाचा : 

त्वचा विकार वारंवार होतात का ? जाणून घ्या घरगुती उपाय

 

Exit mobile version