Monday, July 1, 2024

Latest Posts

Online फसवणूक टाळायची आहे, पण Password कसा ठेवू?

सध्याच्या युगातील सोशल मीडियापासून ते नेट बँकिंग पर्यंत प्रत्येकाचा सुरक्षित वापर करण्यासाठी पासवर्ड (Password) महत्त्वाचा दुवा आहे. प्रत्येक गोष्टीसाठी आता पासवर्ड महत्त्वाचा मानला जातो. पण हा पासवर्ड कशा पद्धतीचा असावा याबाबत अनेकांना शंका असते. अगदी सोपा पासवर्ड ठेवावा की कठीण पण जर कठीण पासवर्ड ठेवला तर तो विसरण्याची सुद्धा शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे अनेकांकडून अगदी सोप्या व सहज ओळखता येईल लक्षात राहील अशा प्रकारच्या पासवर्डचा वापर केला जातो. पण अशा पासवर्ड मुळे ऑनलाइन आर्थिक फसवणुकीच्या घटना वाढताना दिसून येतात. म्हणूनच, ऑनलाईन (Online) माध्यमातून आर्थिक व्यवहारासाठी स्ट्रॉंग पासवर्ड असणे गरजेचे आहे.

ऑनलाइन फसवणुकीच्या घटनांमध्ये सध्या मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. सायबर गुन्हेगारांकडून फिशिंग स्कॅमसारख्या पद्धतीचा वापर करून वैयक्तिक आणि आर्थिक गोष्टींची निगडित असलेली माहिती चोरली जाते. स्क्रॅमर्स (Scammers) कडून खाजगी माहिती चोरून याचा वापर बँकेच्या खात्यातून पैसे काढण्यासाठी केला जातो. सोपा तसेच अंदाज लावता येणारा पासवर्ड जर ठेवला तर अशा घटना वाढू शकतात. सर्वसाधारणपणे अनेकांकडून 1234, 0000, 1010, 9999 अशा प्रकारचे पासवर्ड ठेवले जातात. किंवा मग जन्मतारीख पासवर्ड म्हणून ठेवली जाते. पण असे केल्याने पासवर्ड हॅक होण्याची शक्यता मोठ्या प्रमाणात वाढते. सोशल मीडिया अकाउंट, ईमेल (Email), नेट बँकिंग (Net Banking), डेबिट कार्ड (Debit Card), क्रेडिट कार्ड (Credit Card), इलेक्ट्रॉनिक डिव्हाइस, यूपीआय ऍप (UPI App) यांचा सुरक्षितपणे वापर करण्यासाठी योग्य तो न ओळखता येण्याजोगा पासवर्ड ठेवणे आवश्यक आहे.

सुरक्षित पासवर्ड साठी कोणत्या गोष्टी लक्षात ठेवायच्या?

  1. सोशल मीडिया व आर्थिक व्यवहारासंबंधीत खात्यासाठी वेगवेगळ्या पासवर्ड असायला हवा. यामुळे तुमची वैयक्तिक माहिती चोरी होण्यापासून रोखता येईल.
  2. नियमितपणे ऑनलाईन आर्थिक व्यवहार करत असाल तर अशावेळी टू फॅक्टर ऑथेंटिफिकेशन चा वापर करू शकता.
  3. ऑनलाइन आर्थिक व्यवहार करताना स्वतःच्याच मोबाईल व लॅपटॉपव (Laptop) चा वापर करावा. इतर कोणाच्या डिवाइसचा वापर केल्याने माहिती सेव्ह न करता व्यवहार पूर्ण झाल्यावर लॉग आऊट करणे गरजेचे आहे.
  4. डायरी किंवा कागदावर पासवर्ड लिहून ठेवू नये किंवा तुमच्या पासवर्ड ची माहिती कोणाला देऊ नये यामुळे तुम्ही आर्थिक फसवणूक टाळू शकता.
  5. काही महिन्यांनी पासवर्ड बदलणे गरजेचे आहे. याशिवाय नवीन पासवर्ड ठेवताना तो आठ ते वीस शब्दांचा असावा. पासवर्डमध्ये आकडे अक्षरे व इतर चिन्हांचा समावेश असणे आवश्यक आहे.

हे ही वाचा:

MAHARASHTRA ASSEMBLY MONSOON SESSION 2024 : घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेवर आमदार सत्यजित तांबे यांनी उठवला आवाज

जुलै महिन्यात इतक्या दिवस बँका राहणार बंद ; RBI ने केली जाहीर बँकांच्या सुट्ट्यांची यादी

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss