spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

डोळ्याखालील काळी वर्तुळे घालवायची आहेत ?

एखाद्या सुंदर महिलांच्या किंवा रूबाबदार पुरुषाच्या डोळ्यांखाली जर काळी वर्तुळे दिसू लागली, तर कसे दिसतील ते सांगा? अशी ही डोळ्याखालील काळी वर्तुळे कोणाच्याही सौदर्यांत अडथळे आणू शकता.

एखाद्या सुंदर महिलांच्या किंवा रूबाबदार पुरुषाच्या डोळ्यांखाली जर काळी वर्तुळे दिसू लागली, तर कसे दिसतील ते सांगा? अशी ही डोळ्याखालील काळी वर्तुळे कोणाच्याही सौदर्यांत अडथळे आणू शकता. सध्या ही काळी वर्तुळे बहुतांश व्यक्तीच्या डोळ्याखाली दिसून येतात आणि अश्या या काळी वर्तुळाची अनेक कारणे आहेत

डोळ्याखालील या काळी वर्तुळाचे महत्वाचे कारण म्हणजे शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी होणे. रात्र – दिवस काम, जागरण, अपुरी झोप त्यामुळे मानवी शरीर थकुन जाते. याचा थेट परिणाम डोळ्याखालील त्वचेवर दिसून येतो. डोळ्यांना खाज सुटते. ते सारखे चोळण्याने डोळ्यांखालील रक्तवाहिन्या सारख्या फुटून रंग गडद बनतो. शरीरातील संप्रेरकांच्या (हॉर्मोन्स) परिणामाने या डोळ्यांखालील त्वचेचा रंग काळा पडतो. विशेषतः स्त्रियांमध्ये मासिक पाळीच्या काळात, गरोदरपणात हा परिणाम जाणवतो. डोळ्यांखालची त्वचा तशी नाजूक असते. पण वृद्धापकाळात जरा जास्तच पातळ होते आणि खालच्या रक्तवाहिन्या आणखीनच ठसठशीत होतात. त्यामुळे उतार वयात अशी काळी वर्तुळे डोळ्यांखाली दिसतात. सतत सर्दी होऊन नाकाच्या भागातील रक्तवाहिन्या प्रसरण पावून हे लक्षण दिसते. आहारामधील जीवनसत्वांचा अभाव हेही काळ्या वर्तुळांचे एक प्रमुख कारण आहे. एखाद्या कुटुंबात अशी काळी वर्तुळे पिढ्यान् पिढ्या नजरेस येतात, त्यामुळे अगदी तरुण वयातही ही वर्तुळे दिसू लागतात. अश्या अनेक कारणांमुळे ही काळी वर्तुळे निर्माण होतात.

अशी वर्तुळे घालवण्यासाठी डॉक्टर आणि त्यांनी दिलेल्या वेगवेगळ्या क्रिमचा वापर केला जातो. पण, जर काही घरगुती उपाय केले, तर ही वर्तुळे काही प्रमाणात कमी करता येऊ शकतात. केवळ सौंदर्यासाठी नाही तर आरोग्याच्या दृष्टीनेही या काळ्या वर्तुळांचा विचार व्हायला हवा. हे एखाद्या आजाराचे सूचक लक्षण असू शकते. त्यामुळे ही वर्तुळे कशाने तयार झाली यांच्या मूळाशी जाऊन योग्य ते उपचार करायला हवेत. अशाप्रकारच्या सर्व समस्यांसाठी चांगला आहार, पुरेसा व्यायाम, मानसिक शांती आणि योग्य तेवढा वेळ झोप गरजेची असते. तरीही डोळ्याखाली वर्तुळं येत असतील तर काही घरगुती उपाय करावीत.

  • संतुलित आहाराला प्रथम प्राधान्य द्यावे. कॅल्शियम, प्रोटीन, आयर्न असलेला आहार, त्याचबरोबर जास्त फायबरयुक्त आहार व आहारात पालेभाज्यांचा वापर करावा. दूध व तुपाचे रोज सेवन करावे. फलाहार घ्यावा. तेलकट, तिखट पदार्थ अतिप्रमाणात सेवन करू नये. शरीर रूक्ष होऊ नये म्हणून दर आठ ते दहा ग्लास पाणी प्यावे.
  • टोमॅटो :- एक लहान चमचा लिंबू रस आणि लहान टोमॅटोची पेस्ट एकत्र करुन ते मिश्रण डोळ्याखाली लावावे. हे मिश्रण १० मिनीटे डोळ्यांवर ठेऊन त्यानंतर पाण्याने धुवावे. दिवसातून साधारण दोनवेळा हा प्रयोग केल्यास त्याचा फायदा होतो.
  • गुलाबजल :- गुलाब पाण्यामुळे त्वचा चमकदार होण्यास मदत होते. त्वचेत जीवंतपणा येण्यासाठी या पाण्याचा उपयोग होतो. गुलाबपाण्यात कापसाचे बोळे बुडवून दोन्ही डोळ्यांच्या पापण्यांवर झोपताना नियमित ठेवावेत.
  • काकडी व बटाटा :- काकडीच्या किंवा बटाट्याच्या चकत्या डोळ्यांवर ठेवावेत . काकडीमध्ये पाण्याचा अंश जास्त असल्याने ती आरोग्यासाठी चांगली असते.
  • बदाम तेल :- बदाम तेल केसांच्या, त्वचेच्या आरोग्यासाठी अतिशय उत्तम काम करते. यामध्ये मोठ्या प्रमाणात व्हिटॅमिन ई असते. त्वचा कोमल होण्यासाठी याचा उपयोग होतो. त्यामुळे झोपताना डोळ्याखाली बदाम तेल लावून मालिश केल्यास काळी वर्तुळे दूर होण्यास मदत होते.
  • जायफळ – जायफळात व्हिटामिन ‘ई’ व ‘क’ जास्त प्रमाणात असल्याने जायफळ चांगले पाण्यात उगाळून काळ्या वर्तुळांना रात्री झोपताना लावावे व सकाळी चेहरा स्वच्छ थंड पाण्याने धुवून घ्यावा.
  • मध :- मध त्वचेला पोषण देण्यासोबतच त्वचा कोमल बनवते. डोळ्याच्या खाली मध लावा आणि वीस मिनिटे तसेच ठेवा. यानंतर साध्या पाण्याने चेहरा धुवा आणि कोरडे होऊ द्या. दररोज हा उपाय दोन वेळा करू शकता.

हे ही वाचा :-

देशाच्या बर्फाच्छादित डोंगररांगांपासून ते समुद्राच्या तळापर्यंत फडकला तिरंगा

 

Latest Posts

Don't Miss