spot_img
Sunday, September 8, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

पावसाळ्यात निसर्गरम्य ठिकाणी फिरायला जायचंय? मग ‘या’ धबधब्याला नक्कीच भेट द्या….

पावसाळ्याच्या दिवसात हिरवागार निसर्ग अनुभवण्यासाठी अनेक नागरिक नैसर्गिक क्षेत्रांच्या शोधात असतात. जेणेकरून त्यांना रोजच्या दैनंदिन आयुष्यातून थोडे विश्रांतीचे क्षण अनुभवायला मिळतील.

मुंबईकर दैनंदिन जीवनातील तणाव विसरून विसावाचे क्षण अनुभवण्यासाठी आणि हिरवळ अनुभवण्यासाठी पावसाळ्याची आतुरतेने वाट पाहत असतात. मुंबई सारख्या ताणतणावाच्या ठिकाणात सर्व चिंता विसरून काही आनंदित क्षण अनुभवणे गरजेचे असते. त्यामुळे पावसाळ्याच्या हिरव्यागार वातावरणाचा अनुभव घेण्यासाठी अशी अनेक ठिकाणे महाराष्ट्रात आहेत आणि निसर्गप्रेमी अश्या नैसर्गिक ठिकाणांच्या शोधात सदैव असतात, ज्या ठिकाणी मनमोकळेपणाने जीवन अनुभवता येईल. महाराष्ट्रात असे अनेक विविध धबधबे, ट्रेकिंग ठिकाणे, धार्मिक मंदिरे, ऐतिसाहिक किल्ले (Waterfalls, trekking places, religious temples, cultural forts) आहेत जिथे आपल्याला निसर्गरम्य आणि आल्लाददायक वातावरण अनुभवता येते. परंतु अश्याच अनेक नैसर्गिक ठिकाणांमध्ये सह्याद्री डोंगररांगा सर्वांत जास्त आकर्षित क्षेत्र आहे. आणि ह्याच सह्याद्री डोंगररांगातील अतिशय सुंदर असा कुंभे धबधब्याविषयी आज जाणून घेऊया…

अतिशय शांत आणि कमी गर्दीच्या ठिकाण्या तुम्ही शोधात असाल तर कुंभे धबधबा (Kumbhe Water fall) हा अतिशय योग्य पर्याय ठरेल जेथे तुम्हाला कोणीही व्यत्यय आणू शकत नाही आणि तुम्ही तुमचा वेळ आणि दिवस तुम्ही आनंदात घालवू शकता. महाराष्ट्रात माणगांव येथे हा धबधबा आहे. माणगांव येथून साध्या पायवाटेने आपण ह्या धबधब्यापर्यंत पोहचू शकतो. प्रचंड निसर्गरम्य अश्या वातावरणात निसर्गाचा अनुभव घेता येऊ शकतो. डोंगररांगांच्या मधून खळखळ वाहणारा हा धबधबा अतिशय सुरेख नयनरम्य असे दृश्य निर्माण करतो. तेथील हिरवागार निसर्ग देखावा डोळे दिपवून टाकणारा असतो आणि ह्या पेक्षा सुंदर आणखी कोणता असूच शकत नाही असे तुम्हाला वाटेल.

या ठिकाणी आपण आपल्याला पाहिजे त्या प्रकारे फोटोग्राफी करू शकतो कारण इथे माणसांची वर्दळ फार क्वचित दिसून येते. फारसा हा कोणाच्या माहितीतील नसलेला सह्याद्रीच्या कुशीत वसलेला कुंभे धबधबा आहे. आपल्याला रेल्वेच्या माणगाव रेल्वे स्थानकावरून देखील जाण्याचा मार्ग उपलब्ध आहे. आणि त्याच प्रमाणे पुणे विमानतळावरून जाण्याचा मार्ग देखील आहे. आणि रस्तेमार्गाने जाण्यासाठी माणगांव बसस्थानकापर्यंत सोय आहे. अश्याप्रकारे त्यामुळे तुम्ही गर्दी टाळून या धबधब्याचे आणि तेथील परिसराचा मनसोक्त आनंद लुटू शकता. येथील नैसर्गिक वातावरणात हे मनाला भुरळ पाडणारं असते.

हे ही वाचा:

Pune Monsoon Updates: दुर्घटना टाळण्यासाठी स्वत:सह कुटुंबाची काळजी घ्या, Ajit Pawar यांचे नागरिकांना आवाहन

पूर परिस्थितीत प्रशासन मदतीसाठी फिल्डवर, बचाव कार्य सुरू CM Shinde यांची माहिती

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss