लग्नात स्लिम दिसायचंय ? तर वजन कमी करण्यासाठी करा ‘हे’ उपाय

लग्नात स्लिम दिसायचंय ? तर वजन कमी करण्यासाठी करा ‘हे’ उपाय

आता लग्नाचा सिझन (wedding season) चालू आहे. लग्नाची (Wedding shopping ) अनेक जण खरेदी करताना बाजारात दिसत आहे. लग्न म्हटल्यावर आपण जास्त प्रमाणात खरेदी करतो. पण लग्न म्हटल्यावर खरेदी तर येतेच. त्याच बरोबर सुंदर दिसण्यासाठी काही गोष्टींकडे देखील लक्ष द्यावे लागते. जसे वजन कमी करणे. आपण लग्नासाठी लेहंगा वैगेरे खरेदी करतो पण त्यामध्ये आपले पोट जास्त दिसते त्यामुळे आपला पूर्ण लूक खराब होतो. मुली लग्नामध्ये स्लिम दिसण्यासाठी अनेक औषध उपचार करतात. तरी देखील वजन कमी होत नाही. तर आज आम्ही तुम्हाला या बातमीमधून स्लिम दिसण्यासाठी कोणते उपाय करता येईल या बद्दल सांगणार आहोत.

लग्न ठरल्यानांतर प्रत्येक मुलीला वाटते सुंदर आणि फिट दिसावे. लग्नात स्लिम दिसण्यासाठी तुम्ही योगासने आणि व्यायामचा वापर करू शकता. पण नियमितपणे त्याचा वापर करणे. सकाळी उठल्यावर त्रिकोणासन (Trikonasana) , धनुरासन (Dhanurasana) , सर्वांगासन (Sarvangasana) हि योगासने करू शकतात. ही योगासने केल्याने शरीर फिट राहण्यास मदत होईल.

 

बडीशेपचे पाणी वजन कमी करण्यासाठी खूप उत्तम उपाय आहे. बडीशेपचे सेवन केल्याने पचनक्रिया सुधारण्यास मदत होते. त्यासाठी एक चमचा बडीशेप पाण्यात रात्रभर भिजत ठेऊन द्या आणि त्याचे सकाळी उठल्यावर सेवन करणे, असे केल्याने वजन कमी करण्यास मदत होईल.

वजन कमी करण्यासाठी तुम्ही ओव्याचा देखील वापर करू शकतात. ओव्याचे सेवन केल्याने वजन कमी करण्यास मदत होईल. त्यासाठी एक चमचा ओवा घ्या आणि रात्रभर पाण्यात भिजत ठेवा आणि सकाळी उठल्यावर ओवा गाळून घ्या आणि त्याचे सेवन करा असे केल्याने वजन देखील कमी होईल आणि पचनक्रिया देखील सुधारेल.

ग्रीन टी शरीरातील पाचन तंत्रास वाढवतो. अतिरिक्त चरबीस शरीरातून बाहेर टाकतो. पोलीफिनोन तत्वामुळे शरीरातील अतिरिक्त चरबी बाहेर टाकता येते. त्यामुळे रक्तप्रवाह विकसित होते. व वजन कमी करण्यास मदत होते.

हे ही वाचा:

चमचमीत आणि पौष्टीक मेथीचा पराठा

दुधासोबत मधाचे सेवन केल्यास आरोग्यासाठी गुणकारक ठरेल

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

 

Exit mobile version