spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

वजन कमी करायचं ? मग नक्की वाचा…

प्रत्येकाला असे वाटते की, आपण हेल्दी खावे त्यात वजन कंट्रोलमध्ये ठेवणे खुप मोठे आव्हान आहे. पावसाळ्यात तर वजन वाढण्याच्या अनेक समस्या दिसून येतात.

प्रत्येकाला असे वाटते की, आपण हेल्दी खावे त्यात वजन कंट्रोलमध्ये ठेवणे खुप मोठे आव्हान आहे. पावसाळ्यात तर वजन वाढण्याच्या अनेक समस्या दिसून येतात. तसेच सध्याच्या धावपळीच्या आयुष्यात स्वतःसाठी वेळ काढणं खरं तर फारच कठीण होऊन बसलं आहे मात्र अशक्य नक्कीच नाही. कारण शरीरापेक्षा महत्त्वाचं काहीच नाही. शरीरावर थोडीफार चरबी नक्कीच वाईट दिसत नाही. मात्र ही चरबी वाढायला लागली की, तुम्हाला स्वतःला कळतं की, हे आता हाताबाहेर जात आहे. मात्र याचा अर्थ असा नाही की, तुम्ही प्रयत्न करू शकत नाही. जराही आत्मविश्वास कमी पडू देऊ नका. कारण तुम्हाला हवी असलेली फिगर पुन्हा परत मिळवण्यासाठी हाच आत्मविश्वास कामी येतो. मात्र आज आम्ही तुम्हाला वजन कसं नियंत्रित ठेवायचं, यासंदर्भात सांगणार आहोत.

  • पाणी (Water) : वजन कमी करण्यासाठी उपाय सांगा असं जर कोणी विचारत असेल तर वजन कमी करण्यासाठी उपाय करताना तुम्ही पाण्याचा सर्वात पहिला उपयोग करून घेऊ शकता. पाणी पिणे अधिक फायदेशीर ठरते. पाण्याचे सेवन हे शरीराला हायड्रेट करण्यासाठी अधिक फायदेशीर ठरते, ज्यामुळे वजन कमी करण्यास मदत होते. याचे मुख्य कारण असे आहे की, पाणी तुमची भूक कमी करण्यास अधिक मदत करते. त्यामुळे खाण्याची इच्छा कमी होते आणि वजन कमी करण्यासाठी मदत होते.
  • बीट : वजन कमी करण्यासाठी आहारात बीटचा समावेश करणे, उत्तम असतो. बीटचा सलाद किंवा ज्यूस शरीरासाठी खुप फायदेशीर असतं. बीटमध्ये फायबरचे प्रमाण अधिक असते. बीटरूट खाल्ल्याने लोजास्त वेळ भूक लागत नाही, त्यामुळे वजन कमी होण्यास मदत होते.
  • ग्रीन टी (Green Tea) : वजन कमी करण्यासाठी ग्रीन टी चे सेवनदेखील फायदेशीर ठरते. जलद वजन कमी करायचे असेल तर तुम्हाला काही सवयी आवश्यक आहेत. ग्रीन टी वजन कमी करण्यासह वजन नियंत्रित करण्यासाठीही फायदेशीर ठरते. वास्तविक ग्रीन टी मध्ये कॅटेचिन आणि कॅफेन असल्याने वजन कमी करण्यासाठी आणि वाढत्या वजनावर रोख लावण्यासाठी याचा उपयोग होतो. वजन कमी करण्यासाठी ग्रीन टी हा सोपा आणि परिणामकारक उपाय आहे. तसंच महिलांना वजन कमी करण्यासाठी उपायांमध्ये याचा समावेश करून घेता येतो.
  • गाजर : गाजर हल्ली १२ ही महिने बाजारात दिसून येतात. तुम्हाला वजन कमी करायचं असेल तर तुमच्या आहारात गाजराचा समावेश जरूर करावा. गाजरांमध्ये कॅलरीज कमी प्रमाणात असतात. गाजरमध्ये व्हिटॅमिन A, बीटा कॅरोटीन आणि फायबरचे प्रमाण असते.
  • फॅट्सचे प्रमाण जास्त असणारे पदार्थ खाऊ नका : फॅट्सचे प्रमाण जास्त असेलेल्या पदार्थांचे सेवन केल्यानं वजन वाढते. त्यामुळे हल्दी पदार्थांचा किंवा फळांचा आहारात समावेश करावा. त्यामुळे वजन वाढत नाही. तसेच नारळ पाणी किंवा मोड आलेली कडधान्यांचा आहारात समावेश तुम्ही करु शकता. मैद्यापासून तयार केलेल्या पदार्थांचा समावेश जेवणात करु नका. जेवण तयार करताना मोहरीच्या तेलाचा किंवा खोबरेल तेलाचा वापर करा.

हे ही वाचा :-

 खिलाडी अक्षयचा “कठपुतळी” चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित

वजन कमी करण्यासाठी दही उपयुक्त ठरतं का ?

 

Latest Posts

Don't Miss