पावसाळ्यात ओलसर कपडे घालता; ‘अशी’ घ्या काळजी

पावसाळ्यात ओलसर कपडे घालता; ‘अशी’ घ्या काळजी

मुंबईच्या या धकाधकीच्या जीवनात बऱ्याचदा आपण आपल्याकडे लक्ष देणे कमी करतो. याचा परिणाम हा फार दूरगामी होतो. या दैनंदिन जीवनात स्वतःच्या शारीरिक व मानसिक आरोग्याकडे लक्ष देणे गरजेचे आहे. आपल्याला काही आजार हे सुरुवातीला अगदीच लहान समजतो. पण ते पुढे जाऊन प्रचंड त्रासदायक ठरू शकतात. यासाठी स्वतः कडे लक्ष देणं फार गरजेचे आहे. काही स्वस्त गोष्टींमध्ये अनेक औषधी गुण असतात, ज्यांच्याकडे आपण दुर्लक्ष करत असतो, मात्र याकडे आता दुर्लक्ष करून चालणार नाही. चुकीच्या जीवनशैलीमुळे आपल्याया वेगवेगळ्या आरोग्याच्या समस्यांचा सामना करावा लागतो.

सध्या पावसाळा सुरु आहे. पावसाळ्यात ऊन कमीच पडते. त्यामुळे वातावरण जरा ओलसारच असते. तसेच कपडे सुकण्यासही अडचण येते, त्यामुळे बऱ्याचदा अनेकजण ओलसर कपडेच पावसाळ्यात घालत असतात. परंतु हे आरोग्यासाठी हानिकारक ठरते. त्याचे कारण असे की, ओलसरपणा हे बुरशीचे प्रजननस्थळ आहे. येथे बुरशी अतिशय झपाट्याने वाढत असते. त्यामुळे बुरशी आधारित संसर्गाच्या वाढीसाठी हे पोषक वातावरण समजले जाते. त्यामुळे पावसाळ्यात शक्यतो ओलसर कपड्यांमुळे फंगल इन्फेक्शनची समस्या जाणवते. हे इन्फेक्शन सामान्यतः त्वचा, केस, नखे तसेच तोंडाचा आतील भाग यावर बघण्यास मिळते.

बुरशीमुळे होणाऱ्या आजाराला फंगल इन्फेक्शन म्हणतात. ते कसे दिसते आणि ते तुमच्या शरीरावर कुठे आहे, यावरून डॉक्टर सहसा त्याचे निदान करू शकतात. बुरशीजन्य त्वचेच्या संसर्गावर उपचार करण्यासाठी, अँटीफंगल औषधे घेणे गरजेचे ठरते.

पावसाळ्यात घराबाहेर पडताना काळजी घ्यावी. पावसाने कपडे ओलसर होणार नाहीत याची काळजी घ्यावी. तसेच चांगल्या दर्जाचे सनस्क्रीन लोशन लावावे. पावसाळ्यातील थंड वातावरणामुळे ओठ निस्तेज आणि कोरडे पडू शकतात. अशा वेळी पावसाळ्यात ओठांवर लिप बाम लावावा. यासह तज्ञांच्या सल्ल्याने काही काळजी घेणे गरजेचे आहे. दिवसभरात योग्य प्रमाणात पाणी घ्यावे. अति मेकअप करू नये, दिवसभरात दोन तीन वेळा चेहरा धुवा. त्वचा कोरडी ठेवा, पावसात भिजू नका, भिजल्यास अंग, केस चांगले कोरडे करा. ओले कपडे परिधान करू नये. आहार संतुलित असला पाहिजे. असे केल्यास त्वचेची योग्य प्रकारे काळजी राखली जाते

फंगल इन्फेक्शन हा संसर्गजन्य आजार आहे. तो कुटुंबामध्ये एकापासून दुसऱ्याला होऊ शकतो. त्यामुळे एकमेकांचे कपडे वापरू नये. रुग्णांचे कपडे वेगळे ठेवावे. फंगल इन्फेक्शनवरील उपचारांसाठी त्वचारोग तज्ञ डॉक्टरांचा सल्ला घ्यावा असा सल्ला तज्ञ देतात.

हे ही वाचा:

Ajit Pawar यांना दणका; Sharad Pawar गटात होणार आणखी एक आमदाराची एन्ट्री?

“Raj Thackeray यांच्याशी चर्चा झाल्यानंतर त्यांचं मतपरिवर्तन होईल..”; मंत्री Deepak Kesarkar यांनी व्यक्त केला विश्वास

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version