New Year 2023 नवीन वर्षाचे स्वागत करताय ? तर ‘या’ आरोग्याच्या टिप्स करा फॉलो

New Year 2023 नवीन वर्षाचे स्वागत करताय ? तर ‘या’ आरोग्याच्या टिप्स करा फॉलो

New Year 2023 : नवीन वर्षाला (New Year) सुरुवात होण्यासाठी काही दिवसच राहिले आहेत. तसेच नवीन वर्षाचे स्वागत करण्यासाठी अनेकांमध्ये उत्साह आणि जल्लोष पाहायला मिळतो. नवीन वर्षाचे स्वागत म्हटले की पार्टी तर आलीच, जर तुम्ही पार्टी (Party) करण्याचा विचार करताय तर पार्टीमध्ये Healthy food असणे गरजेचे आहे. जर तुमचे आरोग्य आणि शरीर निरोगी असेल तर तुम्ही नवीन वर्षाचा आनंद घेऊ शकता.

आजकालच्या पार्टीमध्ये तरुण पिढी हेव्ही आणि जंक फूडचा (Junk Food) जास्त वापर करताना दिसते. आणि या पदार्थांचा जास्त वापर केल्याने आरोग्यावर हानिकारक परिणाम होतात. म्हणून पार्टीमध्ये जास्त हेव्ही फूड आणि जंक फूड वापरू नये. मेनू ठरवताना देखील या गोष्टीकडे लक्ष असणे गरजेचे आहे.

तसेच कोल्ड्रिंक्स, कॉकटेल इत्यादी गोष्टींनमध्ये कॅलरीजचे प्रमाण जास्त आढळून येतात. याऐवजी तुम्ही फ्रूट पंच, फळांचा रस, सूप, शेक, मॉकटेल अश्या गोष्टीचे सेवन करू शकता.

 

Starters मध्ये तुम्ही तळलेले पनीर, किंवा कबाब सेवन करू शकता.

मुख्य पदार्थांमध्ये जास्त तेलकट पदार्थ खाणे टाळा. मैद्याच्याऐवजी गव्हाच्या पिठाच्या चपात्या, किंवा तुम्ही भाकरी देखील सेवन करू शकता.

सॅलड आणि फळांचा जास्तीत जास्त वापर करा.

थंडीच्या दिवसात सण साजरा करण्यासाठी तुम्ही Bonfire भोवती नृत्य किंवा खेळ हा खूप चांगला पर्याय आहे. या डान्समुळे पार्टी मध्ये एक वेगळीच मज्जा येते आणि त्याच बरोबर व्यायाम देखील होतो. त्यासाठी पार्टी मध्ये डान्स नक्की करा पण असा डान्स करा की ज्यामुळे शरीराची शारीरिक हालचाल देखील होईल.

थंडीच्या दिवसात उबदार कपडे घालणे गरजेचे आहे :

नवीन वर्षाचे स्वागत आपण आपल्या कुटुंबासोबत किंवा मित्रमैत्रणी सोबत करतो पण त्याच बरोबर आपण आपल्या उबदार कपड्यांची देखील काळजी घेतली पाहिजे. थंडीच्या दिवसात तुम्ही ड्रेसमध्ये सुंदर देखील दिसू शकता. आजकालची लोक फॅशन साठी हिवाळयात उबदार कपड्यानं शिवाय घराबाहेर पडतात, त्यामुळे अनेक आजारांना सामोरे जावे लागते. नवीन वर्षाचे स्वागत करण्यासाठी जर थंडी मध्ये उबदार कपडे न घालण्याचा विचार करत असाल तर ही तुमची खूप मोठी चूक ठरू शकते. हिवाळ्यात निमोनियाचा (Pneumonia) त्रास होण्याची शक्यता असू शकते. म्हणून थंडीमध्ये आरोग्याची काळजी घेणे गरजेचे आहे.

हे ही वाचा :

चमचमीत आणि पौष्टीक मेथीचा पराठा

 

Exit mobile version