spot_img
Sunday, September 8, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

तोंडातील अल्सर म्हणजे काय ? यावर घरगुती उपाय

बदलत्या जीवशैलीमुळे आपण खाण्यापिण्याकडे दुर्लक्ष करतो. त्यामुळे अनेक समस्या उद्भवतात. काही लोकांना “माऊथ अल्सर” ची समस्या होते. यामुळे खाण्यापिण्यात देखील त्रास होतो. तोंडातील अल्सर येण्याची अनेक कारणे असू शकता. मात्र शरीरातील उष्णेतेचे प्रमाण जास्त असल्याने देखील ही समस्या उद्भवू शकते. चला तर मग जाणून घेऊया तोंडातील अल्सर म्हणजे काय आणि अल्सर जाण्यासाठी कोणते उपाय करता येतील.

तोंडातील अल्सर (Mouth ulcers) म्हणजे काय ? –

तोंडातील अल्सर म्हणजे म्हणजे जबड्यात पांढरे आणि लाल फोडी सारखे दिसून येतात. शरीरात जास्त उष्णता असल्याने, पित झाल्याने तोंडात, किंवा तुम्ही जर धूम्रपान करत असला तर यामुळे देखील तोंडात अल्सर येऊ शकते. तोंडातील अल्सर कमी करण्यासाठी मार्केट मध्ये बरेच औषध आणि क्रिम मिळतात. पण यावर घरगुती उपाय केल्याने हे लगेच बरे होण्यास मदत होते आणि यापासून कायमची सुटका मिळते.

 

घरगुती उपाय –

तोंडातील अल्सर बरे होण्यासाठी तुम्ही मधाचा वापर करू शकता. कारण मधामध्ये अँटी-बॅक्टेरियल गुणधर्म असतात. ज्या ठिकाणी तोंडात अल्सर आले आहे त्या ठिकाणी मध लावणे. यामुळे तुम्हाला लगेच आराम मिळू शकतो.

तोंडाचे अल्सर बरे करण्यासाठी तुम्ही तुळशीचे पाने देखील वापरू शकता. कारण तुळस ही औषधी वनस्पती आहे. तुळशीच्या पानांमध्ये अँटी-बॅक्टेरियल, अँटीव्हायरल गुणधर्म असतात. तुळशीच्या पानाचे सेवन केल्याने बेक्टेरिया दूर करण्यास मदत होते.

तोंडातील अल्सर कमी करण्यासाठी तुम्ही लवंग तेलाचा वापर करू शकता. ज्या ठिकाणी तुम्हाला तोंडात अल्सर आले आहे त्या ठिकाणी लवंग तेल लावणे. यामुळे तुम्हाला आराम देखील मिळेल.

तोंडातील अल्सरपासून सुटका मिळवण्यासाठी तुम्ही खोबरे तेलाचा किंवा साजूक तुपाचा देखील वापर करू शकता. कारण खोबरे तेलामध्ये अँटी बॅक्टेरियल गुणधर्म असतात. जे अल्सरचे जंतू कमी करण्यासाठी त्याचा वापर होतो. तसेच साजूक तुपाचे आरोग्यसाठी देखील खूप फायदे आहेत. अल्सरच्या ठिकाणी खोबरे तेल किंवा सजून तूप लावणे त्यामुळे लगेच आराम मिळतो.

हे ही वाचा :

One Nation One ITR Form : कॉमन आयटीआर फॉर्म म्हणजे काय? संपूर्ण माहिती घ्या जाणून

‘BMC वरही भाजप झेंडा फडकवेल’, आदित्य ठाकरेंचे मतदारसंघात येऊन भाजप युवा मोर्चाचे अध्यक्ष तेजस्वी सूर्या यांचे वक्तव्य

Kartiki Ekadashi 2022 : कार्तिकी एकादशीनिमित्त फडणवीस दाम्पत्यांनी वारकऱ्यासोबत धरला ठेका ! पहा फोटो

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

 

Latest Posts

Don't Miss