ब्रेस्ट कॅन्सर म्हणजे काय ? जाणून घ्या लक्षणे

ब्रेस्ट कॅन्सर म्हणजे काय ? जाणून घ्या लक्षणे

ब्रेस्ट कॅन्सरचा धोका आजकाल तरुण मुलीन मध्ये खूप वाढताना दिसत आहे. तसे कॅन्सर मध्ये वेगवेगळे प्रकार पाहायला मिळतात. ब्रेस्ट कॅन्सर म्हणजे स्तनाचा कर्करोग स्त्रियांच्यात सर्वात जास्त प्रमाणात आढळणारा कर्करोग आहे. आणि या कॅन्सरमुळे अनेक लोकांना देखील सामोरे जावे लागते. गेल्या वर्षीच्या कॅन्सरच्या रुग्णांपैकी ३० टक्के अर्थात ६९० महिलांना ब्रेस्ट कॅन्सर असल्याचे दिसलं आहे. यापैकी १० टक्के म्हणजेच २३० युवती २० ते ३० वयोगटातल्या आहेत. २० टक्के म्हणजे ४६० महिला या तिशीनंतरच्या आहेत.

हे ही वाचा : सर्दी आणि खोखल्यावर त्रिकटू चूर्णाचे रामबाण उपाय

 

ब्रेस्ट कॅन्सरचा रोग म्हणजे स्तनाचा कर्करोग होय हा रोग महिल्यांमध्येच नाहीतर पुरुषामध्ये देखील दिसून येतो. ब्रेस्ट कॅन्सर आजकाल प्राण्यांमध्ये देखील दिसून येतो. आणि या आजारांची रुग्ण खूप वाढतांना दिसत आहे. पुरुषाला स्तनाच्या कर्करोगाचा धोका १००० पैकी १ असतो. कारण त्यांच्या स्तनाच्या पेशी स्त्रियांच्या तुलनेत कमी विकसित असतात. आणि महिल्यांमध्ये हार्मोन्सची पातळी कमी असते ज्यामुळे स्तनाच्या पेशींच्या वाढीवर परिणाम होतो.

ब्रेस्ट कॅन्सरची लक्षणे –

स्तनाच्या ठिकाणी गोळा येणे.

स्तनाच्या ठिकाणी सूज किंवा बारीक खळगा पडणे.

स्तनाच्या ठिकाणी भरपूर प्रमाणात खाज येणे.

त्या बाजूस पांढरेपणा येतो.

चिडचिड होणे, जास्त वेदना होणे , डोकेदुखी होणे.

स्तनावर जखम होणे.

स्तनाग्रातून रक्तस्त्राव होणे.

जर तुम्हाला अशी लक्षणे आढळल्यास डॉक्टरांचा सल्ला लगेच घेणे. आणि वेळेवर उपचार करणे.

 

ब्रेस्ट कॅन्सर टाळण्यासाठी काय करावे ? –

मद्यपान टाळावे.

कमी प्रमाणात हार्मोनल थेरपी

हेल्दी जीवनशैली.

नियमित व्यायाम आणि योगासने करणे.

आहार वेळेवर करणे.

लठ्ठपणा नियंत्रित ठेवणे.

बाहेरील पदार्थ पासून दूर राहणे. म्हणजे फास्ट फूड , तेलकट , तिखट पदार्थ.

जे पदार्थ खाल्याने शरीराची चरबी वाढते असे पदार्थ खाणे टाळा.

हे ही वाचा : 

या आजरांमुळे डोळ्यांचे आरोग्य बिगडू शकते, लक्षणे दिसल्यास ताबडतोब करून घ्या उपचार

 

Exit mobile version