मायोसिटिस म्हणजे काय ? जाणून घ्या लक्षणे…

मायोसिटिस म्हणजे काय ? जाणून घ्या लक्षणे…

मायोसिटिस (Myositis) मुळे स्नायू कमकुवत होतात. ज्यामुळे रक्तवाहिन्यांसारख्या संबंधित ऊती आणि स्नायू कमकुवत होतात. हे मांड्या, आणि खांद्यासारख्या अनेक स्नायूना कमकुवत करते. पण हा आजार ३० ते ४० वर्ष वयोगटातील महिल्यांमध्ये दिसून येतो. पुरुषांपेक्षा महिलांना या आजाराचा धोका जास्त असतो आणि मुलांवरही याचा परिणाम होऊ शकतो.

हे ही वाचा : सतत गरम पाणीचे सेवन करू नये, नाहीतर होतील गंभीर आजार…

 

मायोसिटिस या आजाराचा सर्वात जास्त परिणाम खांदे, नितंब आणि मांड्यांभोवतीच्या स्नायूंवर होतो. तसेच या वेदना शरीरातील इतर भागांमध्येसुद्धा होतात. त्यामुळे श्वास घ्यायला खूप त्रास होतो. तसेच मायोसिटिस या आजरामुळे डोळ्यांच्या बाजूला देखील सूज येते. आणि याचा त्रास रोजच्या दैनंदिन जीवनात जास्त प्रमाणात होतो. मायोसायटिसमुळे शरीरात ऑटोइम्यून स्थिती निर्माण होते, तसेच डर्माटोमायोसिटिस, इन्क्लुजन-बॉडी, जुवेनाईल मायोसिटिस, पॉलीमायोसिटिस आणि टॉक्सिक मायोसिटिस असे मायोसिटिसचे एकूण पाच प्रकार आहेत.

डर्माटोमायोसिटिसमुळे (Dermatomyositis) चेहरा, छाती, पाठीवर लाल फोड्या येणे. तसेच खडबडीत त्वचा, थकवा, स्नायू कमकुवत, स्नायू दुखणे, वजन कमी होणे इत्यादी लक्षणे आहेत.

इन्क्लुसिव्ह-बॉडी मायोसिटिस (Inclusive-body myositis) यामुळे पुरुषांना जास्त त्रास होतो. हा आजार ५० वर्षावरील पुरुषांमध्ये दिसून येतो. त्यामध्ये देखील स्नायू कमकुवत होणे आणि स्नायू दुखणे यांचा समावेश होतो.

 

जुवेनाइल मायोसिटिस (Juvenile myositis) हा आजार मुलांमध्ये होतो. तसेच हा आजार मुलांपेक्षा मुलींमध्ये जास्त दिसून येतो. त्याची लक्षणे लाल फोड्या थकवा, ओटीपोटात दुखणे, बसलेल्या स्थितीतून उठण्यास त्रास होणे, स्नायू कमकुवत होणे, सांधेदुखी, ताप इत्यादी दिसून येते.

पॉलीमायोसिटिसची (Polymyositis) सुरुवात स्नायूंच्या कमकुवतपणासारख्या लक्षणांनी होते. स्नायू कमकुवत होणे आणि दुखणे, अन्न पचन करतांना समस्या, कोरडा खोकला, हातावरची त्वचा जाड होणे, थकवा लागणे, अशी लक्षणे दिसून येतात.

टॉक्सिक मायोसिटिस (Toxic myositis) म्हणजे ज्या औषधाची तारीख निघून घेली आहे. आणि ते औषध घेतल्यास टॉक्सिक मायोसिटिस हा आजार होतो. स्टॅटिनसारख्या कोलेस्टेरॉलच्या औषधांमुळे असे होते.

मायोसिटिसच्या रुगणांना स्टेरॉईड देऊन हा आजार नियंत्रणात आणला जातो. जर औषध देऊन पण सुधारणा होत नसेल तर या रुग्णांनी फिजियोथेरेपी, आणि नियमित व्यायाम करणे गरजेचे आहे.

हे ही वाचा :

winter season : हिवाळ्यात घ्या ‘अशी’ काळजी

 

Exit mobile version