डोळे येणे म्हणजे काय ? जाणून घ्या

डोळे येणे म्हणजे काय ? जाणून घ्या

डोळे येणे हा आजार सर्वांना होतो. हा संसर्ग प्रामुख्याने वातावरणामध्ये बदल झाल्याने होतो आणि बॅक्टेरिया किंवा वायरस सारख्या सूक्ष्म जीवाणूंमुळे हा आजार पसरतो. तसेच डोळ्यांची साथ ही दरवर्षी पसरत असते. या आजाराला ‘कंजंक्टिव्हायटिस’ असेही म्हणतात. डोळे आलेल्या व्यक्तीच्या दीर्घकाळ संपर्कात येणे, तसेच अशा व्यक्तीचा रुमाल, त्याने वापरलेले डोळ्यांचे ड्रॉप्स अशा वस्तू वापरणे, यामुळे निरोगी व्यक्तीलाही या साथीचा संसर्ग होण्याची शक्यता असते. डोळे येण्याचा संसर्ग कसा होतो ?

हे ही वाचा: केसगळती साठी मेथीचे तेल वापरणे

 

सर्व प्रथम एकाच डोळ्याला डोळा येतो. पण एक डोळा आल्यानंतर दुसऱ्या डोळ्यालाही संसर्ग होतो. एकदा व्यक्तीचे डोळे येऊन गेले की पुन्हा डोळे येण्याचा संसर्ग होत नाही असे बोले जाते पण तसे नसते. डोळे येणे हे कधीपण होऊ शकते. आणि खूप वेळा येऊ शकते. एकदा डोळे येऊन गेले की त्या साथीविरोधात शरीरात प्रतिकारशक्ती तयार होते हे खरे, पण म्हणून पुन्हा संसर्ग होणारच नाही असे नाही.

डोळ्यांना संसर्ग झाल्याचे ओळखणे कठीण नाही. डोळ्यांत सतत कायतरी जाण्याचा भास होणे. डोळ्यातून पाणी येणे, घाण येते. डोळे लाल होणे या देखील समस्या होतात. ही लक्षणे आधी एका डोळ्याला आणि नंतर दुसऱ्या डोळ्याला दिसू लागतात.

 

डोळ्यांच्या संसर्गामुळे डोळ्यांच्या आतल्या पापण्यांच्या आतल्या भागांना सूज येऊन ते लाल दिसू लागतात.

डोळ्यांतून पाणी येऊन किंवा ‘ घाण येऊन पापण्या चिकटतातही.

काही वेळा डोळ्यांना खाज येते, डोळे जड वाटतात.

तीव्र प्रकाश डोळ्यांना सहन होत नाही.

काही लोकांना कानांच्या भागांना सूज येते.

डोळ्यांचे संसर्ग झाल्यास काही लोकांना ताप , सर्दी , डोके दुखी होणे, या सारखे देखील लक्षणे दिसून येतात.

डोळ्यांचे संसर्ग झाल्यास डोळ्यांना फार काही दिसत नाही. भुरळ भुरळ दिसते.

कशी काळजी घ्यावी –

डोळ्यांचे संसर्ग हा पाच दिवस असतो.

तसेच ज्या लोकांना डोळे आले आहे त्यांचा रुमाल , टिशू पेपर न वापरणे.

डोळे आल्यास डॉक्टरांचा सल्ला घेणे. कोणतेही ट्यूब वगरे न वापरणे.

हे ही वाचा:

तरुण वयात पाठदुखीची समस्या वाढते तर करा हे घरगुती उपाय

 

Exit mobile version