सफरचंदावर का लावतात स्टिकर त्या फळावर असलेल्या स्टिकरचा अर्थ काय? ९९% लोकांना माहित नाही हा प्रकार

सफरचंदावर का लावतात स्टिकर त्या फळावर असलेल्या स्टिकरचा अर्थ काय? ९९% लोकांना माहित नाही हा प्रकार

पुणे,मुंबई असो किंवा अन्य लहान गावे,सर्वच ठिकाणी विकल्या जाणाऱ्या संत्रे,सफरचंदावर स्टिकर लावलेले असतात. ही फळे घेत असताना विक्रेता हा नेहमीच ती फळ एक्स्पोर्ट क्‍वालिटीचे असल्याचे सांगतो.या स्टिकरचा एक्स्पोर्ट इंपोर्टशी काहीही संबंध नसतो.त्यामुळे ती फळे अनेकदा महाग देखील विकली जातात. फळांवरती स्टिकर लावलं म्हणजे ते नकीच चांगल्या क्‍वालिटीची असतील असा समज आपला असतो आणि ती फळ विकत घेतो. ग्राहक बाजारामधून किंवा मॉलमधून संत्री,सफरचंद किंवा अन्य फळे विकत घेतात. त्या फळावर विशिष्ट प्रकारचे स्टिकर लावलेले असतात. सफरचंद,संत्र्यासारख्या फळावर लावलेल्या स्टिकरचा अर्थ काय असतो? हे १०० पैकी ९९% लोकांना माहित नसते. परिणामी फळ विक्रेता ग्राहकांना सहज फसवू शकतात. स्टिकरसह चमकदार सफरचंद पाहून, लोकांना वाटते की ते महाग असले पाहिजे.

४ अंकी स्टिकरचा अर्थ काय?

बाजारामधून किंवा मॉलमधून घेणाऱ्या फळांवर ४ अंकी स्टिकर दिसले तर सावध व्हा. ते फळ घेण्याआधी काळजी बाळगा. फळाच्या स्टिकरवर लिहिलेले क्रमांक ४ अंकांनी सुरु होतात. जसे की ४५७८ किंवा ४०८१. म्हणजेच फळांच्या स्टिकरवर चार अंक असतील आणि त्यांची सुरुवात ४ ने होत असेल तर अशी फळे, कीटकनाशके आणि घातक रसायनाचा वापर करून तयार केलेले असतात. हे फळावरील असलेले आकडे फळांची गुणवत्ता दर्शवतात. तुम्हाला ही फळे थोडी कमी किंमतींत मिळू शकतात. पण हे तुमच्या आरोग्यासाठी नुकसान करू शकते.

५ अंकामध्ये असलेले स्टिकर
जर फळावर ५ अंकाचं स्टिकर असेल तर त्या स्टिकरचा देखील एक विशिष्ट अर्थ आहे. या फळावरील स्टिकरची संख्या ८ ने सुरु होतात. जर ८६५२ किंवा ८४१३१ इत्यादी. जर फळांवर असे अंक लिहलेले असतील तर त्याचा अर्थ असा ते जेनेटिकल मोडीफाइड आहेत. याचा अर्थ असा की फळ नैसर्गिक नसून प्रयोगशाळेमध्ये विकसित केले आहेत. परंतु त्याचे तोटेही आहेत.
तर मग आपल्यासाठी उत्तम काय आहे?
उत्तम क्‍वालिटीच्या फळांवर कोणत्या प्रकारचे स्टिकर लावले जातात ते पाहूया, चांगल्या क्‍वालिटीच्या फळांवर स्टिकरवरील संख्या ५ अंकीच आहे. मात्र त्याची सुरुवात ९ पासून होते. जसे ९८११४ असे काही असू शकते. याचा अर्थ असा की ही फळे कीटकनाशक आणि रसायनांशिवाय सेंद्रिय पद्धतीने तयार केलेली असतात. साहजिकच त्यांची किंमत इतरांपेक्षा जास्त असते. पण आपण आपल्या आरोग्याचा विचार करता अशी फळे आपल्या आरोग्यासाठी उत्तम असतात.

हे ही वाचा:

PM Narendra Modi यांच्या हस्ते अमरावती टेक्सटाईल पार्कचं ई-भूमिपूजन; Navneet Rana यांना अश्रू अनावर

काँग्रेसला गणपती पूजेची चीड, त्यांनी माझ्या पूजेलाही विरोध केला: PM Narendra Modi

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा. 

Exit mobile version