गरोदर पणात कोणता आहार घ्यावा, जाणून घ्या…

गरोदर पणात कोणता आहार घ्यावा, जाणून घ्या…

आई (Mother) होणे स्त्रीच्या आयुष्यातील सर्वात सुंदर आणि आनंदाची गोष्ट आहे. एकदा गरोदर (pregnant) राहिल्यानंतर स्वतःची विशेष काळजी घ्यावी लागते. कारण या गोष्टीमुळे गर्भपात देखील होऊ शकतो. तर आज तुम्हाला या बातमी मधून गरोदर पणात कोणता आहार घ्यावा या बद्दल सांगणार आहोत. गरोदर असल्यास आरोग्याची काळजी घ्यावी लागते. गरोदर पणात निष्काळजीपणा केल्यास आरोग्यावर हानिकारक परिणाम होतात.

प्रत्येक आईची इच्छा असते की आपले बाळ तंदुरुस्त आणि सुदृढ असावे. गरोदर पणात आरोग्याची आणि बाळाची खूप काळजी घेतली जाते. गरोदर काळात स्त्रियांनी योग्य आहार आणि जास्त प्रमाणात पोषक तत्वे ज्या पदार्थामध्ये आहेत असे पदार्थ सेवन केल्यास आरोग्यावर परिणाम होत नाही. या दिवसांमध्ये लोह युक्त पदार्थ खाणे गरजेचे आहे. गर्भवती स्त्रियांनी आहारात खनिजे, जीवनसत्वे, इत्यादी पदार्थाचा समावेश करून घ्यावा. चला तर मग जाणून घेऊया गरोदर पणात कोणता आहार घ्यावा.

 

गरोदर पणात हिरव्या पालेभाज्या याचे सेवन करणे. हिरव्या पालेभाज्या आरोग्यासाठी खूप उपयुक्त असते. पालेभाज्या मध्ये फायबर, व्हिटॅमिन्स असे पोषक घटक आढळून येतात. जे गरोदर पणात खूप गरजेचे असतात. पालेभाज्यांचे सेवन केल्याने शरीर आणि बाळ निरोगी राहण्यास मदत होते. म्हणून हिरव्या पालेभाज्याचे सेवन करणे.

गरोदर पणात दुधजन्य पदार्थ सेवन करणे. ते आरोग्यासाठी खूप फायदेशीर असते. दुधा पासून बनवलेल्या पदार्थामध्ये कॅल्शियम, व्हिटॅमिन्स, खनिजे असे पोषक घटक असतात. म्हणून दुधाचे पदार्थ सेवन करावे. तसेच सकाळी आणि संध्याकाळी दुधाचे सेवन करणे.

ड्रायफ्रूटचे सेवन आवर्जून करणे. जसे की बदाम, काजू, अक्रोड, अंजीर, पिस्ता, इत्यादी सेवन करणे. कारण ड्रायफ्रूट मध्ये फायबर, व्हिटॅमिन्स, कॅल्शियम असे घटक असतात. म्हणून गरोदर पणात ड्रायफ्रूट सेवन करावे.

अंडी, मांसाहारी पदार्थ सेवन करणे. या मध्ये प्रथिने, अँटी- ऑक्सिडंट , पॉटेशियम, लोह, असतात जे आरोग्यासाठी खूप गरजेचे असते. आणि शरीर तंदुरुस्त राहते.

 

हे ही वाचा : योगासने करण्याची योग्य पद्धत, जाणून घ्या…

हे ही वाचा : 

तुरीच्या डाळीचे आरोग्यदायी फायदे…

 

 

Exit mobile version