spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

बाळांना दात येतात तेव्हा…

दात येणे ही बाळाच्या वाढी दरम्यान होणारी एक खूप महत्वाची प्रक्रिया आहे. दात येत असल्यास बरीच मुले रडून पालकांना हैराण करतात. सहाजिकच त्यामुळे बाळाला दात येणे ही पालकांसाठी एक आव्हानात्मक स्थिती असू शकते. सामान्यत: बाळाला वयाच्या ६ ते २४ महिन्यांच्या दरम्यान दात येतात.

दात येणे ही बाळाच्या वाढी दरम्यान होणारी एक खूप महत्वाची प्रक्रिया आहे. दात येत असल्यास बरीच मुले रडून पालकांना हैराण करतात. सहाजिकच त्यामुळे बाळाला दात येणे ही पालकांसाठी एक आव्हानात्मक स्थिती असू शकते. सामान्यत: बाळाला वयाच्या ६ ते २४ महिन्यांच्या दरम्यान दात येतात. पण कधीकधी काही मुलांना अगदी लवकर म्हणजे ३ महीन्यांनी तर कधीकधी अगदी उशीरा म्हणजे १२ महिन्यांनी देखील दात येण्यास सुरुवात होते. त्याचप्रमाणे वरच्या पुढील दातांआधी बाळाला खालचे पुढील दात प्रथम येतात. बाळाला दात एकदम जोडीनेच येत असतात. अगोदर मध्यभागी खालच्या बाजूचे दोन दात येतात. नंतर महिन्यानंतर वरच्या भागाचे दात यायला लागतात. काही वेळा बाळांमध्ये वरची किंवा खालचीही येऊ शकतात. तसे त्यांचे येण्याचे निश्चित नसते. दात येताना बाळाच्या हिरड्या संवेदनशील होतात त्यामुळे बाळ रडते अथवा चिडचिड करते. आपल्या तान्हा बाळाला वेदना सहन करताना पहाणे पालकांना देखील थोडे कठीण जाते. तुमचे बाळ या वेदना सांगू शकत नसल्याने ते त्याच्या भावना रडून अथवा चिडून व्यक्त करु शकते.

दात येताना बाळामध्ये दिसणारी काही लक्षणे-

  • बाळ चिडचिड करते असेल तर काळजी करु नका. तुमच्या बाळाला दात येत आहेत का ते पहा.
  • मुलांचे दात निघणे सुरू होतात तेव्हा त्यांच्या हिरड्यांवर सूज येऊन त्यात खाज सुटते, म्हणून मुलं चिडचिडी होतात. या वेळेस मुलं बोटं नेहमी तोंडात टाकत राहतात.
  • हात,बोटे किंवा मिळेल ती वस्तू बाळ चावू लागते असे पदार्थ अथवा बोटे चावल्याने बाळाच्या हिरड्यांना आराम मिळतो. या काळात मुलं आपल्या आजूबाजूची कुठलीही वस्तू दिसली की तोंडात घालतात म्हणून सर्वात जास्त महत्त्वाचे म्हणजे त्यांच्याकडे लक्ष देणे गरजेचे आहे.
  • ज्या ठिकाणी बाळाला दात येतात ती जागा लालसर, थोडी फुगलेली वाटते, आणि हिरड्याही सुजलेल्या वाटतात. किंवा फुगलेल्या सारखी दिसते.
  • बाळाला जेव्हा दात निघण्यास सुरूवात तेव्हा त्यांना हगवणं लागते, आणि त्यामुळे ते अस्वस्थ होतात तर त्या वेळेस त्यांच्या खाण्या-पिण्याची व्यवस्थित काळजी घ्यावी.
  • दूध पिण्यास अथवा खाण्यास नकार देते-असे असल्यास बाळाला जबरदस्ती खाण्यास देऊ नका कारण दात येत असल्यामुळे बाळाची भूक कमी होते.
  • दात येण्याच्या वेळी बाळाला ताप येत असतो. सर्दीही होत असते. काही वेळा बाळ दात व हिरड्या खूप सळसळ करता तेव्हा सरळ जी वस्तू नजरेला दिसते ती तोंडात घेते आणि त्यामुळे बाळाला इन्फेक्शन होऊन जाते. ह्यात डायरिया सुद्धा होऊन जातो. त्यामुळे तुम्ही जर बाळाला काही वस्तू देत असाल तर ती गरम पाण्यात बुडवून द्या. टीथर देत असाल तेही गरम पाण्यात थोडं बुडवून द्या. म्हणजे बाळाला त्यातून काही अपाय होणार नाही. त्यामुळे ह्या गोष्टी लक्षात घेऊन घ्या. म्हणजे बाळ आजारी पडणार नाही.
  • बाळाची नेहमीपेक्षा जास्त गळणारी लाळ हे त्याला दात येण्याचे एक प्रमुख लक्षण असू शकते.पण ब-याचदा पालकांचा असा गैरसमज होतो की ही लाळ आपल्या हातातील चॉकलेट किंवा गोड पदार्थांमुळे गळत आहे.
    तुमच्या बाळाला हिरड्या येत आहेत हे लक्षात येताच त्याच्या कोवळ्या हिरड्यांवरुन स्वच्छ बोटे अथवा कापड फिरवून त्याच्या हिरड्यांना हलका मसाज करा.
  • तुमच्या बाळाला दुधाचे काही दात आल्यावर ते दिवसातून दोन वेळा मऊ टुथब्रशने स्वच्छ करण्यास विसरु नका.
    बाळ जरा मोठे झाल्यावर रात्री स्तनपान करणे अथवा दूधाच्या बाटलीने दूध देणे कमी करा. त्यामुळे बाळाचे दात लवकर किडणार नाहीत.

 

हे ही वाचा :-

बिल्किस बानो प्रकरणातील गुन्हेगारांच्या सुटकेसाठी न्यायव्यवस्थेला जबाबदार धरू नका, न्यायधीशांचे स्पष्टीकरण   

सस्पेन्स आणि थ्रिलर चित्रपट पाहायला पसंत करता तर, हा चित्रपट आवर्जून पहा

 

Latest Posts

Don't Miss