जिंगल बेल म्हणून लहान मुलांना भेट देणारा सांताक्लॉज नक्की कोण? जाणून घेऊया सविस्तर माहिती

दरवर्षी प्रमाणे नाताळ हा सण २५ डिसेंबरला साजरा केला जातो.

जिंगल बेल म्हणून लहान मुलांना भेट देणारा सांताक्लॉज नक्की कोण? जाणून घेऊया सविस्तर माहिती

दरवर्षी प्रमाणे नाताळ हा सण २५ डिसेंबरला साजरा केला जातो. प्रत्येकाला आपल्या बालपणी सांताक्लॉजची कथा सांगितली गेली असेल. नाताळ सणाच्या दिवशी पांढरी दाढी आणि पांढरे केस असलेला सांता लाल रंगाचे कपडे आणि टोप्या घालून येतो. तसेच त्याच्याकडे एक भली मोठी बॅग असते. ज्या बॅगमध्ये बऱ्याच गोष्टी ठेवलेल्या असतात. बॅगमधील सगळ्या वस्तू लहान मुलांना गिफ्ट म्हणून दिले जातात. पण तुम्हला माहित आहे का खरा सांता कोण होता? चला तर जाणून घेऊया सविस्तर माहिती…

सेंट निकोलसचा जन्म तिसऱ्या शतकातील उत्तर ध्रुवावर स्थित मायरा येथील एका श्रीमंत कुटुंबामध्ये झाला होता. या संत निकोलस ला खरा सांता म्हणतात. नंतर हळूहळू त्याचा विश्वास येशूवर वाढत गेला. त्यांनी स्वतःचे पालक म्हणून येशूचा स्वीकार केला होता. पुढे निकोलस मोठा झाल्यावर ख्रिस्ती धर्माचा धर्मगुरू बनला होता. त्याला लहानपणीपासूनच लोकांना मदत करायला आवडत होत. त्यामध्ये अशे लोक ज्यांची परिस्थिती गरीब आहे, लहान मुले, अश्याना तो मदत करायचा. निकोलस या सर्व लहान मुलांना तो ख्रिसमसच्या भेटवस्तू द्याचा. परंतु त्याला कोणालाही त्याची ओळख सांगायची नव्हती म्हणून तो मध्यरात्री कपडे बदलून घरातून बाहेर पडायचा. आपल्या मोठ्या झोळीत तो सर्व लहान मुलांना आणि गरजू मुलांना भेटवस्तू द्याचा. १९३० साली सांता अस्तित्वात आला. हेडन सँडब्लोम नावाच्या एक कलाकाराने कोका-कोलाच्या जाहिरातीमध्ये सांताक्लॉजची भूमिका साकारली होती. हा सांता ३५ वर्ष टीव्हीवर झळकला. लाल कपड्यातील पांढरी दाढी असलेला सांता लहान मोठ्यांसह सगळ्यांना आवडला. त्यानंतर त्याची क्रेझ मोठ्या प्रमाणावर वाढत गेली.

सेंट निकोलस याचे उदाहरण म्हणजे त्याने एका गरीब माणसाला मदत केली होती. ज्याच्याकडे त्याच्या तीन मुलींचे लग्न करण्यासाठी अजिबात पैसे नव्हते. तो माणूस त्याच्या मुलींना जबरदस्तीने मजुरी आणि देह विक्री करण्यासाठी सांगायचा. त्यावेळी संत निकोलसने गुपचूप तीन मुलींच्या मोज्यांमध्ये सोन्याच्या नाण्यांची पिशवी ठेवली होती. त्याने या तीन मुलींना सुखरूप त्यांच्या संकटातून सोडवलं. त्यावेळेपासून लहान मुली घरच्या खिडकीमध्ये एक मोजा टांगून ठेवतात.

हे ही वाचा:

मेहंदी रचली गं ; स्वानंदी-आशिषची लगीनसराई,मेहंदीचे फोटो आले समोर

Anil Kapoor birthday  : सिनेसृष्टीतील एव्हरग्रीन अनिलजी यांचा बॉलीवूड प्रवास जाणुन घ्या

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version