spot_img
Sunday, September 8, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

World Brain Day का साजरा करतात? काय आहे त्याचं महत्त्व?

World Brain Day: प्रामुख्याने दरवर्षी प्रमाणे २२ जुलै या दिवशी जागतिक मेंदू दिवस साजरा केला जातो. मेंदू हा आपल्या शरीराचा महत्त्वाचा भाग आहे . मेंदू आपल्या संपूर्ण शरीरावर नियंत्रण ठेवत असतो, त्यामुळे तो निरोगी असणं फार महत्वाचे असते. मेंदूशी निगडित आजार आणि त्याला निरोगी ठेवण्याचा मार्ग लोकांपर्यंत पोहचवणे हा जागतिक मेंदू दिन साजरा करण्यामागचा हेतू आहे. २०१४ साली पहिल्यांदाच वर्ल्ड फेडेरेशन ऑफ न्यूरोलॉजी द्वारे जागतिक मेंदू दिन साजरा करण्यास सुरुवात झाली. वर्ल्ड फेडेरेशन ऑफ न्यूरॉलॉजी ची स्थापना बेल्जियम येथे २२ जुलै १९५७ रोजी झाली. या संस्थेत जगभरातील अनेक तज्ज्ञ सहभागी होतात.

आजकालच्या धकाधकीच्या जीवनात अनेक गोष्टींचा आपल्या आरोग्यवर विपरीत परिणाम होत आहेत. त्यामध्ये मोबाईल हाच सर्वात मोठा परिणामकारक घटक बनला आहे. यामुळे मेंदूवर परिणाम होऊन आपल्या आरोग्यावर दुष्पपरिणाम होतात. मोबाईलच्या अतिवापरामुळे केवळ आपल्या मेंदूशीच संबंधित नव्हे तर डोळ्यांशी संबंधित समस्यादेखील ओढवतात. पर्यायी यामुळे डोळ्यांच्या आजारांना देखील सामोरे जावे लागते. मेंदूवर होणारे दुष्परिणाम टाळून आपल्या मेंदूला निरोगी आणि स्वस्थ ठेवणे हे अत्यंत गरजेचे आहे. मेंदू निरोगी असेल तरच आपल्या शरीराचे आरोग्य निरोगी राहील. बरेचदा मेंदूशी संबंधीत आजारांकडे दुर्लक्ष केलं जात आणि लक्षात आल्या नंतर त्याला उशीर होऊन गेला असतो आणि आपला जीव धोक्यात येऊ शकतो. मेंदूचे आरोग्य चांगले ठेवणे अत्यंत गरजेचे आहे.

वर्ल्ड फेडेरेशन ऑफ न्युरोलोजी तर्फे मेंदूचे आरोग्य आणि त्यासंबंधित आजार यावर जनजागृती करण्यासाठीच २२ जुलै रोजी दरवर्षीची वेगळी थिम ठेवून आयोजन केले जाते . २०२३ रोजी ‘मेंदूचे आरोग्य’ या संबंधित थिम आयोजित करून साजरा करण्यात आला होता तसेच २०२४ मध्ये ‘मेंदूचे आरोग्य आणि प्रतिबंध’ ह्या थीम सह आयोजन करून साजरा केला जाणार आहे.

हे ही वाचा:

Mumbai उपनगर जिल्ह्यासाठी जिल्हा नियोजनमधून ‘इतक्या’ कोटींची तरतूद – Mangal Prabhat Lodha

Devendra Fadnavis Birthday: राजकीय चढ-उतार ते यशस्वी नेता, असा आहे फडणवीसांचा प्रवास

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss