spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

सकाळच्या वेळी हृदयविकाराचा झटका का येतो ? जाणून घ्या कारणे

हृदयविकाराचा झटका हा सामान्य आजार झाला आहे. हृदयविकाराचे झटके आजकाल तरुण पिढींना सुद्धा येऊ लागले. हृदयविकाराचे झटके आजकल सकाळी जास्त येतात त्याचे कारण असे की कार्डिअ‍ॅक अरेस्टचा धोका वाढत आहे. हृदयविकाराचा झटका कधीही कोणाला कुठेही येऊ शकतो. तर चला जाणून घेऊया त्यामागची कारणे.

हे ही वाचा : तुम्ही उभे राहून पाणी पिता ? मग ‘हे’ दुष्परिणाम देखील वाचा

 

गेल्या काही वर्षात हृदयविकाराचा झटका हा आजार खूप वाढताना दिसत आहे. तसेच बहुतेक लोकांना हृदयविकाराचा झटका हा पहाटच्या वेळी येतो आणि अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. पण तुम्ही कधी ते जाणून घेतले आहे का हृदयविकाराचा झटका सकाळी पहाटच्या वेळी का येतो. कारण शरीरातील हार्मोन्स बाहेर पडल्यामुळे येतो. त्याचे कारण सकाळी पहाटच्या वेळी आपले शरीर सायटोकिनीन नावाचे हार्मोनं सोडते त्यामुळे सकाळी अचानक हृदयविकाराचा झटका येतो.

रात्रीच्या वेळी लोक खूप थकलेली असतात त्यामुळे त्यांना झोपेची खूप आवश्यक्यता असते. सकाळी लोक खूप सक्रिय असतात. यामुळे जैविक वेळेप्रमाणे सकाळच्या पहिल्या काही तासात आपला रक्त दाब आणि हृदय यांची गती वाढते. त्यामुळे रक्तवाहिन्या या काळात अधिक संकुचित झालेल्या असतात. सर्कॅडियन रिदम शरीराच्या आत २४ तासांच्या घड्याळाप्रमाणे आहे जे वातावरण आणि दिवे बदलत असताना तुमच्या झोपण्याच्या आणि जागण्याच्या वेळ मागे ठेवते.

 

सकाळच्या वेळी येणारे हृदयविकाराचे झटके त्यासाठी सर्कॅडियन रिदम मानला जातो. रक्तातील प्लेटलेट्स चिकट असतात आणि एड्रेनालाईन ग्रंथींमधून वाढलेल्या एड्रेनालाईनच्या स्त्रावमुळे कोरोनरी धमन्यांमध्ये प्लेक तुटतो तेव्हा बहुतेक हृदयविकाराचा झटका येतो. रक्तामध्ये PAI-1ची पेशी जास्त असल्यास त्यामुळे रक्तातील गुठळ्या तयार होऊ शकतात. त्यामुळे हृदयविकाराचा झटका येऊ शकतो. लंडनच्या क्वीन मेरी युनिव्हर्सिटीमध्ये केलेल्या आणखी एका संशोधनात असे आढळून आले की हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी रोग असलेल्या रुग्णांच्या रक्तातील संरक्षणात्मक रेणूंची पातळी सकाळी लक्षणीयरीत्या कमी होते. त्यामुळे यावेळी रक्ताच्या गुठळ्या आणि हृदयविकाराचा धोका वाढतो.

मधुमेह , उचारक्तदाब यामुळे हृदयविकाराचा धोका वाढतो. तरुण पिढीला सुरुवातीपासून हृदयविकाराचे झटके येऊ लागतात. फास्ट फूड , वेळेवर झोप न होणे, ताणतणाव वाढणे , किंवा मद्यपान करणे यासारख्या कारणामुळे हृदयविकाराचा धोका अजून वाढू शकतो

हे ही वाचा : 

साबुदाणा खरेदी करताय… ? मग या बाबी नक्की लक्षात घ्या

 

Latest Posts

Don't Miss