Saturday, September 28, 2024

Latest Posts

मान का दुखते ? आणि त्यावर घरगुती उपाय…

मानेतील वेदना (Nack Pain) ही एक समस्या आहे. ज्यामुळे काही लोक खूप त्रस्त झाले आहे . जर मानेची नस दबली गेली तर मानेच्या वेदना होतात . चुकीच्या पद्धतीने बसणे , किंवा दिवसभर कॉम्प्युटर , लॅपटॉपचा वापर केल्याने मान वाकलेली राहू शकते . यामुळे मानेच्या स्नायूमध्ये वेदना होऊ शकतात . मानेच्या वेदना ठीक होतात पण काही वेळा ठीक होत नाही. जर त्या वेदना जास्त वेळ राहिल्या तर आपल्या दैनंदिन जीवनात त्याचा मोठा प्रभाव होऊ शकतो. काही वेळा मानेचे दुखणे खांद्यापासून ते हातापर्यंत या वेदना होतात . काही वेळा मान हळू हळू दुखते तर काही वेळा अचानक मध्ये दुखणे चालू होते . मानेचे दुखणे अंगावर काढू नका लगेच डॉक्टरांचा सल्ला घ्या . वेळेवर औषध उपचार करा .

हे ही वाचा : या’ भाज्या चुकून ही फ्रिजमध्ये ठेवू नका, आरोग्यावर होईल घातक परिणाम

 

जर तुम्ही बराच काळ ऑफिसमध्ये काम करत असाल किंवा रात्री चुकीच्या स्थितीत झोपत असाल तर मानेचे दुखणे वाढू शकते . हे कोणालाही होऊ शकते . मान दुखीला जरी घरगुती किंवा अजून काही उपाय असले तरी मानेचा त्रास कमी होत नाही .

मान दुखण्याची कारणे –

मान अचानकमध्ये जड होणे .

मानेला अचानकमध्ये लचक भरणे .

झोपण्याची चुकीची पद्धत .

जर तुम्ही जास्त ताण घेत असला तर मानेचे दुखणे वाढू शकते .

किरकोळ अपघात आणि दुखापत.

 

मानदुखीवर घरगुती उपाय –

मानेवर दाब येईल अशा स्थितीत राहू नका . फोन , लॅपटॉप , कॉम्युटर याचा वापर कमी प्रमाणात करा . डोक्यावर जड वजन घेऊ नये .

झोपेच्या वेळी उंच उशी वापरू नका .

पोटावर झोपू नका कारण ही स्थिती झोपेच्या वेळी मानेची स्थिती मुरडते किंवा फिरवते आणि मानेच्या स्नायूंवर दबाव टाकते. म्हणून एकाच अवस्थेत झोपू नका.

खांद्यावर जड गोणी , पिश्याव्या उचलू नका . ते घेतल्याने मानेवर ताण येऊ शकतो आणि मानेच्या वेदना वाढू शकतात .

जास्त धावपळ करू नका .

हे ही वाचा :

Women Safety : महिलांनो नाईट शिफ्टमध्ये काम करताय ? तर या गोष्टी नक्की जाणून घ्या…

 

 

Latest Posts

Don't Miss