spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

वारंवार लघवी का होते ? त्यासाठी घरगुती उपाय

वारंवार लघवी होणे आरोग्यासाठी चांगले नाही.

वारंवार लघवी होणे आरोग्यासाठी चांगले नाही. कारण वारंवार लघवी होणे हे शरीरात काही तरी बिघाड झाला असल्याचे संकेत देत असते. सतत लघवी झाल्यास तुम्हाला अशक्तपणा येऊ शकतो. तुमची झोप अर्धवट होऊ शकते. अर्धवट झोप झाल्यास तुमचे डोके वगरे दुखू शकते. तुमचे कामात लक्ष लागू शकत नाही. सारखे सारखे पोट दुखी, किडण्या फेल, मधुमेह या सारखे आजर असल्याने तुम्हाला सतत लघवीचा त्रास होऊ शकतो. हा लघवीचा त्रास कमी करण्यासाठी घरगुती उपाय.

हे ही वाचा :हृदयाची काळजी कशी घ्यावी

 

वारंवार लघवी होण्याची कारणे –
मधुमेह – मधुमेहाच्या रुग्णांच्या शरीरातील गुल्कोजची पातळी वाढल्यास गुल्कोज लघवी वाटे बाहेर पडते. त्यामुळे मधुमेहाच्या रुग्णांना लघवीचा त्रास सतत होत असतो.

व्यायाम – अनेकदा व्यायाम केल्याने शरीरातील पाणी कमी होते, त्यामुळे आपण वारंवार पाणी पियत असतो. वारंवार पाणी पिल्याने आपल्याला सतत लघवी होत असते.

गरोदर पणा – वाढत्या गर्भामुळे गर्भाशयाचा दाब मूत्रपिंडावर पडतो. त्यामुळे गरोदर स्त्रियांना वारंवार लघवी होण्याची समस्या होते.

औषदांचे साईड इफेक्ट – सतत बाहेरचे खाल्याने आपल्या आरोग्यावर परिणाम होतो. आणि आपल्याला वेगवेगळे आजार होतात. आजार बरे करण्यासाठी आपण डॉकटर कडे जातो औषादांचा वापर जास्त प्रमाणात झाल्यास आपल्या आरोग्यावर औषदांचे साईड इफेक्ट होतात. त्यामुळे आपल्याला सतत लघवी होत असते.

किडनी स्टोन – किडनी स्टोन तुमच्या आरोग्यासाठी एक मोठी समस्या असू शकते. किडनी स्टोन हे नैसर्गिकरित्या आढळणारे खनिजे असतात जे एकत्र होतात आणि गुठळ्यासारखा कडक दगड तयार करतात. परंतु मूत्राशयात दगड असलेल्या स्त्रियांना रात्री जास्त वेळा लघवी करण्याची इच्छा असते. शरीरातील किडनी स्टोनमुळे जळजळीत वेदना आणि अस्वस्थता देखील जाणवू शकते.

 

वारंवार लघवी कमी करण्यासाठी घरगुती उपाय –

डाळिंबाचा रस – डाळिंबाचा रस आरोग्यसाठी पौष्टिक असल्याने तुम्ही त्याचे सेवन करू शकता. डाळिंबाचा रस नियमित पणे पिल्याने तुमच्या लघवीच्या समस्या कमी करण्यासाठी मदत होऊ शकते.

आवळ्याचा रस – आरोग्यास आवळ्याचा रस गुणकारी असतो. आवळ्याचा रस गरम पाण्यात मिक्सकरून पिल्याने लघवीची समस्या कमी होऊ शकते.

तुळशीचे पाने – कधीकधी मूत्रमार्गातील इनफेक्शमुळे तुम्हाला वारंवार लघवीला होतं. अशावेळी तुळशीच्या पानांचा तुम्हाला चांगला फायदा होऊ शकतो. कारण तुळशीच्या पानांच्या रसामुळे तुमचे इनफेक्शन कमी होऊ शकते. यासाठी सकाळी उठल्यावर दोन ते तीन तुळशीची पाने चुरडून त्याचा रस मधासोबत घ्या.

केळी – सकाळी सकाळी रोज एक किंवा दोन केळी खाणे शरीरासाठी उपयुक्त असू शकते. आणि लघवीची समस्या दूर होऊ शकते. आणि केळी जास्त प्रमाणात खाल्यानी शरीरावर परिणाम होऊ शकता.

पाल्येभाज्या – रोजच्या आहारामध्ये हिरव्या पालेभाज्यांचा समावेश करणे. पाल्येभाज्याचा समावेश केल्याने आरोग्याला ऊर्जा मिळते. आणि रक्तवाढीस मदत होते. आणि पोटातील विकार कमी होतात. त्यामुळे लघवीचे प्रमाण कमी होते.

हे ही वाचा :

प्रोटीनयुक्त असणाऱ्या अंड्याचे फायदे

 

Latest Posts

Don't Miss