spot_img
Tuesday, September 24, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

लहान मुलांमध्ये कर्करोगाचा धोका कश्यामुळे वाढलाय? ‘या’ सवयी ठरतात कारणीभूत…

सध्याच्या युगात लहान वयातच कॅन्सर होण्याच प्रमाण खूप मोठ्या वाढलं आहे. मोठ्या व्यक्तींच्या तुलनेत लहान मुलांमध्ये कर्करोगाची लक्षणे ही लवकर दिसून येतात.

सध्याच्या युगात लहान वयातच कॅन्सर होण्याच प्रमाण खूप मोठ्या वाढलं आहे. मोठ्या व्यक्तींच्या तुलनेत लहान मुलांमध्ये कर्करोगाची लक्षणे ही लवकर दिसून येतात. परंतु अनेकदा आपण त्या लक्षणांकडे पूर्णपणे दुर्लक्ष करतो. पण आपण वेळीच सावध होऊन तज्ज्ञांचा सल्ला घेणे आवश्यक आहेत. 30 वर्षांत संपूर्ण जगातील ५० वर्षांखालील लोकांमध्ये जवळपास ७९ टक्के कॅन्सरचे रुग्ण वाढल्याचं उघड झालं आहे. त्यामुळे कॅन्सरची सुरुवातीची लक्षणं ओळखणं ही सध्याची सर्वात महत्त्वाची गरजच आहे.

भारतात ‘या’ प्रकारच्या कॅन्सर रुग्णांत वाढ

कॅन्सरला रोखण्यासाठी आपल्या जीवनशैलीत बदल करणं गरजेचं आहे. कॅन्सरवर करण्यात आलेल्या अभ्यासानुसार भारतासह २०० देशांवर संशोधन करण्यात आलं आहे आणि त्या आधारे हा अहवाल तयार करण्यात आला आहे. भारतात स्तनाचा कर्करोग (Breast Cancer) आणि अन्ननलिका कर्करोग (Esophageal Cancer) चे रुग्ण सर्वाधिक असल्याचं संशोधनातून उघड झालं आहे.

कमी वयात कॅन्सर होण्यामागचं नेमकं कारण काय?

खराब जीवनशैली, प्रदूषण आणि फारसं सक्रिय नसणं या कारणांमुळे कर्करोग होण्याची शक्यता आहे. खराब जीवनशैलीमुळे (Poor Lifestyle) हे कॅन्सरच्या रुग्णांत वाढ होण्याचं सर्वात मोठं कारण असू शकतं. धुम्रपान (Smoking), वेप ओढणे, अल्कोहोल पिणे (Alcohol Consumption), जंक फूड खाणे (Junk Food) आणि अधिक केमिकलयुक्त अन्न खाल्ल्यामुळे कॅन्सरचे धोके वाढू शकतात.

फोन अतिवापर आणि जंक फूड देखील ठरु शकतं कारण

फोनचा अतिवापर (Excessive Use of Phone) आणि कमी अक्टिव्ह राहणं (Less Active) यामुळेही काही व्यक्तीमध्ये कॅन्सरचा धोका वाढतो. त्यामुळे प्रत्येक व्यक्तीने आपल्या जीवनशैलीची विशेष काळजी घेण गरजेच आहे. बाहेरील अन्न (Outside Food) आणि जंक फूडमुळे (Junk Food) आपल्याला आतड्याच्या विविध समस्या निर्माण होतात .

प्रदूषण ‘हे’ देखील मोठं कारण

कर्करोगाच्या रुग्णांमध्ये वाढ होण्यामागे प्रदूषण हे मोठं कारण असू शकते. हवेच्या मार्गाने सल्फर, कॅडमियम आणि कारखान्यातील प्रदूषण आपल्या शरीरात प्रवेश करते. कार्सिनोजेन्स हा देखील फुफ्फुसाचा कर्करोग आणि अनेक रोगांना कारणीभूत ठरू शकतो. यासोबतच आपला चुकीचा आहार (Wrong Diet) आणि जीवनशैलीमुळे पोटात गॅस होण्याचं प्रमाण आणि आतड्याचा कर्करोग होण्याचं प्रमाण वाढलं आहे.

खराब जीवनशैली ठरते घातक

दिल्लीतील एम्सचे प्रोफेसर आणि कॅन्सर सर्जन डॉ. एमडी रे यांच्या म्हणण्याप्रमाणे, खराब जीवनशैली आपल्या शरीराला खूप महागात पडत आहे. खराब जीवनशैलीमुळे 30 टक्के तरुणांना कॅन्सर या आजाराने ग्रासलं असल्याचंही या अभ्यासानुसार समोर आलं आहे. 45 वर्षांखालील लोक देखील खराब जीवनशैलीमुळे या आजाराना बळी पडत आहेत. या संशोधनातून स्तनाच्या कर्करोगाची सुरुवातीची लक्षणे देखील स्पष्ट झाली आहेत.

काय आहे स्तनाच्या कर्करोगामागील कारणं?

स्तनाच्या कर्करोग होण्यामागील सर्वात मोठं कारण म्हणजे, इस्ट्रोजेन हार्मोन्स आहे. ते शरीरातील टिश्यूज आणि डीएनए बदलतात. कर्करोगाच्या बाबतीत, कौटुंबिक इतिहास 5-10 टक्के भूमिका बजावतो. आजकाल 20 ते 22 वयोगटातील मुलींना देखील स्तनाच्या कर्करोगाने (Breast Cancer) ग्रासले आहे. या प्रकरणात 15 ते 20 टक्के वाढ झाली आहे. केमिकलयुक्त अन्नामुळे देखील कर्करोग होतो. केमिकलयुक्त अन्न खाल्ल्याने ते अवयव, रक्ताभिसरण, त्वचा आणि शरीरातील मऊ पेशींना त्रास देते आणि त्यामुळे त्याचं कार्य बदलते. आपले जीन्समध्ये बदलत असतात, त्यामुळे देखील कर्करोग होऊ शकतो.

 

या लेखात नमूद केलेल्या पद्धती आणि सूचनांचे अनुसरण करण्यापूर्वी, डॉक्टर किंवा संबंधित तज्ञाचा सल्ला घ्या.

हे ही वाचा:

Latest Posts

Don't Miss