घरामध्ये तुळस का असते ? घ्या जाणून माहिती

गावाकडच्या भागात आपल्याला आजही अंगणात मोठं तुळशी वृंदावन बघायला मिळेल. शहरातही अनेकांच्या घरात तुळस असते पण फ्लॅट सिस्टीम मुळे प्रत्येकालाच घराबाहेर तुळस लावता येतेच असं नाही

घरामध्ये तुळस का असते ? घ्या जाणून माहिती

गावाकडच्या भागात आपल्याला आजही अंगणात मोठं तुळशी वृंदावन बघायला मिळेल. शहरातही अनेकांच्या घरात तुळस असते पण फ्लॅट सिस्टीम मुळे प्रत्येकालाच घराबाहेर तुळस लावता येतेच असं नाही, त्यामुळे अनेक लोकं आपल्या घरातच कुंडीत तुळशीचं रोप लावतात. पण घरात तुळस लावण्यामागेही आणि कुठे लावावी यामागेही एक शास्त्र आहे.

हिंदू धर्मामध्ये तुळशीच्या रोपट्याला अत्यंत पूजनीय मानले जाते. अशी मान्यता आहे की, तुळशीच्या रोपट्याला देवी लक्ष्मी स्वरूप मानले जाते. हिंदू धर्मात प्रत्येक घरामध्ये तुळशीच्या रोपट्याची पूजा केली जाते. वास्तू शास्त्रामध्ये देखील तुळशीच्या रोपट्याला अत्यंत शुभ मानले जाते. तुळशीच्या रोपट्यामुळे घरामध्ये सकारात्मक ऊर्जा निर्माण होते. तुम्हाला हे ठाऊकच असेल की, तुळशीमध्ये रामा आणि श्यामा हे दोन प्रकार असतात. परंतु या दोन प्रकारांव्यतिरिक्त अजून दोन तुळशीचे प्रकार आहेत. ज्याला कापूर तुळस आणि वन तुळस देखील म्हटलं जातं.

भारतीय संस्कृती, परंपरेमध्ये तुळस महत्त्वाची मानली गेली आहे. तुळस आरोग्यासाठी खूप फायदेशीर मानली जाते. तुळशीची पानं खाल्ल्याने अनेक रोग दूर होतात. तुळस घरात ठेवणं शुभ असतं. यामुळे घरात शांतता आणि आनंदी वातावरण राहतं. आपल्या सोयीनुसार तुळस अंगणात किंवा एखाद्या कुंडीमध्ये लावली जाते. घरातल्या तुळशीच्या रोपाची काळजी घ्यावी. तुळशीला दररोज पाणी घालावं. ती सुकली असेल तर लगेचच काढून टाकावी आणि नवं रोपटं लावावं. सुकलेली तुळस घरात ठेवू नये, असं म्हणतात.

कुठे लावावं तुळशीचं रोप

– घरामध्ये किंवा अंगणात तुळशीचं झाड असावं. तुळशीचं झाड घरात असल्याने घरात सकारात्मक ऊर्जा येते.
– पश्चिम, उत्तर किंवा ईशान्य दिशेला तुळस ठेवावी. पूर्व दिशेला तुळस ठेवू नये, असं म्हणतात.
– घराच्या छतावरही तुळस ठेवू नये, असं म्हटलं जातं. घराच्या छतावर तुळस ठेवल्यास दोष लागतो आणि फायद्याऐवजी नुकसान व्हायला लागतं.

तुळशीचे फायदे

– तुळस घरामधले सगळे दोष दूर करते. तसंच तुळशीमुळे परिवाराचं आरोग्यही चांगलं राहतं.
– कोणत्याही आजारावर तुळस हा रामबाण उपाय आहे. शरीराची प्रतिकारशक्ती वाढविण्यासाठीही तुळस खूप प्रभावी आहे.
– सर्दी-खोकला पळवण्यासाठीही तुळशीचा वापर केला जातो.
– कोरोना झाल्यावरही तुळशीची पाने खाण्याचा सल्ला देण्यात आला.
– याचबरोबर तुळशीला धार्मिक, सांस्कृतिक महत्त्व आहे. वारकरी संप्रदायात तुळशीला महत्त्वाचं स्थान आहे. वारकरी गळ्यात तुळशीची माळ घालतात.

हे ही वाचा:

winter season : हिवाळ्यात घ्या ‘अशी’ काळजी

Diwali 2022 : द्या भाऊबीजच्या अनोख्या शुभेच्छा…

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version