winter season : हिवाळ्यात घ्या ‘अशी’ काळजी

winter season : हिवाळ्यात घ्या ‘अशी’ काळजी

हिवाळा(winter) हा ऋतू चालू झाला आहे. हिवाळ्यात गुलाबी थंडीची चाहूल लागते. हिवाळा हा ऋतू सर्वांना आवडतोच अस नाही. कारण हिवाळ्यामध्ये जास्त प्रमाणात थंडी असते. हिवाळ्यात वातावरणात कधी कधी चढ- उतार देखील होते. हिवाळ्यात सर्दी ,खोकला , कफ यासारखे लक्षणे जास्त प्रमाणात दिसून येतात. हिवाळ्यात आरोग्याची काळजी आवर्जून घेतली पाहिजे. हिवाळा मध्ये ऐसी वापरू नये. त्यामुळे शरीराला अजून त्रास होतो. तर आज आम्ही तुम्हाला या बातमी मधून अशा काही गोष्टी सांगणार आहोत जे तुम्हाला उपयोगी पडतील.

हे ही वाचा : हिवाळ्यात अशी घ्या त्वचेची काळजी…

 

हिवाळयात (in winter) फायबर आणि पोषकयुक्त पदार्थ खाणे. हिवाळ्यात नियमितपणे व्यायाम आणि योगासने करणे. त्यामुळे शरीरात उष्णता राहते. हिवाळ्यात शरीरामध्ये उष्णता असणे फार गरजेचे आहे. थंडीमध्ये लोकरच्या कपड्यांमधून शरीरावर थंडीचा कोणताही परिणाम होत नाही. पण अशा काही गोष्टी आहेत ज्या कमी प्रमाणात वापरावे नाहीतर त्याचे परिणाम शरीरावर दिसून येतात.

हिवाळ्यात थर्मोकोट (Thermocot) वापरावे. यामुळे शरीरात उष्णता राहते. तसेच तुम्ही हिवाळयात स्टाईल म्हणून थर्मोकोट (Thermocot) देखील वापरू शकतो. हिवाळ्यात उबदार कपडे घालावे. ते देखील तुम्ही स्टाईल म्ह्णून वापरू शकता. तसेच तुम्ही स्वेटर(sweater),कलरफुल मफलर(Colorful muffler) ब्रेसलेट(bracelet), असे देखील तुम्ही स्टाईल करू शकता.

हिवाळयात त्वचेची काळजी घेणे फार गरजेचे आहे. कारण हिवाळयात आपली त्वचा कोरडी पडते. त्यामुळे त्वचेवर पांढऱ्या रेषा देखील उद्भवतात. त्यामुळे आपली त्वचा सुंदर दिसत नाही. त्वचे मध्ये ओलावा टिकून राहण्यासाठी त्वचेला सीरम (Serum) किंवा बॉडी लोशन (body lotion) लावणे. यामुळे त्वचेवरील ओलावा टिकून राहतो.

हिवाळयात जाडसर कपडे वापरणे. त्यामुळे थंडी कमी प्रमाणात वाजते. आणि थंडीचे तापमान देखील कमी वाटे. हाता पायांना देखील ओलावा टिकून राहण्यासाठी तुम्ही मोजे (socks) वापरू शकता. यामुळे हातापायांना ओलावा टिकून राहतो आणि थंडी देखील वाजत नाही. म्हणून हिवाळयात शरीराची काळजी घेणे खूप गरजेची आहे.

हे ही वाचा :

मधुमेहाच्या रुग्णांसाठी घरीच तयार करा शुगर फ्री लाडू…

 

Exit mobile version