spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

winter traveling tips हिवाळयात फिरायला जायचा विचार करताय, तर प्रवासात या’ गोष्टी सोबत ठेवा

हिवाळा (winter) हा ऋतू सर्वांनाच आवडतो. पण हिवाळयात आरोग्याची काळजी घेणे खूप गरजेचे आहे. हिवाळ्यातील वातावरण हे थोडे वेगळे असते. तसेच बहुतेक लोक थंडी (winter) मध्ये बाहेर फिरायला जाण्याचा प्लॅन (Plan) करतात. कारण थंडी मध्ये मुलांना दिवाळीच्या आणि नाताळच्या शाळेला सुट्या पडतात त्यामुळे लोक बाहेर फिरायला जाण्याचा विचार करतात. तसेच भारतात फिरण्यासारखे बरेच ठिकाण आहे. सुट्यांमध्ये बाहेर फिरायला गेल्यास तुम्हाला थोडे चेंज झाल्यासारखे वाटे. थंडीत बहुतेक लोक आजारी पडतात, आणि सतत आजारी पडणाऱ्या लोकांना थंडी मध्ये फिरायला जायाला आवडत नाही. कारण त्यांना असे वाटे की थंडीत बाहेर पडल्यास सर्दी खोकला होऊ शकतो. तर आज आम्ही तुम्हाला या बातमी मधून थंडीत प्रवास करताना कोणत्या गोष्टी सोबत ठेवाव्या या बद्दल सांगणार आहोत.

प्रवास करताना सोबत मेडीकल कीट (fastred box ) ठेवणे गरजेचे आहे. ज्यामुळे तुम्हाला प्रवास करताना कोणत्याही गोष्टीचा त्रास होणार नाही. ट्रिपला गेल्यावर आपण ट्रेकींग (Trekking ) रनिंग (Runnin) अश्या गोष्टी करतो. अश्या गोष्टी करताना तुम्हाला दुखापत होऊ शकते. अशा वेळी तुम्हाला मेडीकल कीट उपयोगी पडेल. ट्रिपला जातांना आरोग्याची काळजी आवर्जून घ्या, सर्दी, खोकला झाल्यास दुर्लक्ष करू नका.

 

मासिक पाळी कधीही येऊ शकते, त्यासाठी बॅग मध्ये पॅड आणि नॅपकिन सोबत ठेवणे. त्यामुळे महिल्यांचा प्रवास सुखाचा होईल. जर तुम्हाला पोटदुखी वगरे होत असेल तर पोटदुखीच्या गोळया सोबत ठेवणे.

थंड हवा आरोग्यासाठी त्रास दायक ठरू शकते. त्यामुळे थंडीत फिरायला जाताना सोबत स्कार्फ (Scarves) , कानटोपी (ear cap) स्वेटर (sweaters) ठेवणे. यामुळे तुम्हाला सर्दी, खोकला वगरे होणार नाही आणि थंडी पासून तुमचा बचाव होईल.

ट्रिपला जाताना बहुतेक लोक ४ -५ बॅग घेऊन जातात. पण असे करू नये ट्रिपला जाताना एकच मोठी बॅग घेणे हे तुम्हाला खूप फायदेशीर ठरू शकते. आणि सोबत हॅन्डबॅग ठेवणे ज्यामध्ये तुम्ही पाणी सुका खाऊ अश्या गोष्टी ठेऊ शकतात.

हे ही वाचा:

चमचमीत आणि पौष्टीक मेथीचा पराठा

दुधासोबत मधाचे सेवन केल्यास आरोग्यासाठी गुणकारक ठरेल

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

 

 

Latest Posts

Don't Miss