महिला दिनानिमित्त आपल्या आवडत्या व्यक्तीला द्या ‘या’ खास भेटवस्तू

खरंतर पतीने पत्नीला गिफ्ट देण्यासाठी कोणत्याही खास दिवसाचीव वाट पाहयची नसते.आपल्याला वाटलं तर गिफ्ट द्याचे असते.

महिला दिनानिमित्त आपल्या आवडत्या व्यक्तीला द्या ‘या’ खास भेटवस्तू

खरंतर पतीने पत्नीला गिफ्ट देण्यासाठी कोणत्याही खास दिवसाचीव वाट पाहयची नसते.आपल्याला वाटलं तर गिफ्ट द्याचे असते.जवळपास प्रत्येक घराघरात पती-पत्नींमध्ये भेटवस्तुंची देवाण-घेवाण ही होतचं असते.दरम्यान आता या महिन्यात एक खास दिवस येतो आहे.तो दिवस फक्त महिलांसाठी असतो म्हणजे ८ मार्च रोजी साजरा करण्यात येणारा महिला दिन.या दिवशी तुम्ही तुमच्या प्रिय व्यक्तिला खास भेटवस्तु देऊ शकता.तरतुम्हाला तुमच्या प्रिय व्यक्तिला गिफ्ट द्यायचे असेल पण तुम्ही त्या वस्तुच्या शोधात असाल. तर काळजी करू नका. कारण या महिन्यात आठ तारखेला येणारा महिला दिन स्पेशल आहे.या महिन्यात तुम्ही तुमच्या लाडक्या पत्नीला, प्रियसीला आकर्षक गिफ्ट देऊ शकता. भेटवस्तू द्यायची काय? असा प्रश्न पडला असेल. तर काळजी करू नका.चला तर मग जाणुन घ्या  पत्नीला किंवा लाडक्या आईला महिला दिनाची भेटवस्तू काय द्यायची याच्या काही टीप्स.  

हेडफोन्स

आजकाल सगळ्येच  मोबाईल फोन वापरत असतात. पण हेडफोन्स प्रत्येकाकडेच असतील असे नाही. त्यामुळेच आई असो वा पत्नी सगळ्यांसाठी कामाची वस्तू असलेले हेडफोन्स तुम्ही त्यांना देऊ शकता. कारण आजकाल आई पत्नी स्वयंपाक करताना किंवा महत्त्वाचं काम करत असताना तिला याची गरज भासू शकते. तसेच पत्नीला नोकरीचे कॉल्स करण्यासाठी याची गरज भासू शकते.   

हेअर स्ट्रेटनर, स्टाईलिस्ट

प्रत्येक फंक्शनमध्ये आपण उठून दिसावं. प्रत्येकाने आपले कौतुक करावे असे प्रत्येकीलाच वाटते. अशातच तुम्ही जर पत्नीला हेअर स्टायलिस्ट अन् स्ट्रेटनर दिलात तर तिचा बराच वेळ वाचेल. तसेच कमी वेळात पार्लरमध्ये जाऊन आल्यासारखेच तिला तयार होता येईल.

स्मार्ट वॉच

आजकालच सगळं जगच स्मार्ट झालं आहे. तेव्हा तुम्ही तुमच्या जोडीदाराला एक स्मार्ट वॉचही भेट देऊ शकता. बजेटमध्ये असताना तुम्ही सहज स्मार्ट घड्याळ मिळवू शकता. महिला दिनी तुम्हाला तुमच्या बजेटमध्ये तुमच्या पत्नीला काही द्यायचे असेल तर यापेक्षा चांगली भेट दुसरी असूच शकत नाही.

आयफोन

आयफोन स्वत:कडे असावा असे प्रत्येकालाच वाटते. कारण, तो फोन आपला स्टेटस काय आहे हे दाखवतो. त्यामुळेच तुम्ही तुमच्या पत्नीला आयफोन देऊ शकता. यामुळे ती खूश होईल. आयफोनच बजेट नसेल तरी तुम्ही चांगला स्मार्टफोन घेऊ शकता.प्रत्येकालाच आयफोन घेण खिशाला परवडेलचं असं नाही.त्यामुळे तुमच्या बजेटमध्ये देखील छान फोन तुम्ही गिफ्ट करु शकता.

हे ही वाचा:

पेरूच्या पानांमध्ये ‘हे’ पदार्थ मिक्स करून खाल्ल्याने शरीराला होतो फायदा, जाणून घ्या फायदे

‘तुमची मुलगी या जागी असती’…चाहत्यांवर भडकली रिंकू,नेमकं घडलं काय?

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version