महिलांचे आरोग्य काळाची गरज …

आरोग्याचा विचार केला तर महिलांचे आरोग्य या घटकाला त्यामध्ये अनन्य साधारण महत्त्व आहे. हे नाकारून चालणार नाही. या देशातील महिलांचे आरोग्य चांगले राहिले तर त्याचा परिणाम निश्चितपणे देशाच्या सर्वांगीण विकासासाठी होऊ शकेल.

महिलांचे आरोग्य काळाची गरज …

आरोग्याचा विचार केला तर महिलांचे आरोग्य या घटकाला त्यामध्ये अनन्य साधारण महत्त्व आहे. हे नाकारून चालणार नाही. या देशातील महिलांचे आरोग्य चांगले राहिले तर त्याचा परिणाम निश्चितपणे देशाच्या सर्वांगीण विकासासाठी होऊ शकेल. आज आपल्या देशातील महिलांचे आरोग्य ही चिंतेची बाब बनली आहे. या महिलांचा विकास लहानपणापासूनच व्हायला हवा. तिच्या शारीरिक व मानसिक आरोग्याची जपणूक होणे आवश्यक आहे. स्त्री आरोग्याविषयी आणि त्याच्या स्वरूपाविषयी, अगदी मासिक पाळीपूर्व तणाव, मेनॉपॉज, हृदयविकार ते मानसिक आरोग्य, अयोग्य आहारातून निर्माण होणारे विविध आजार व लैंगिक संबधामुळे पसरणारे आजार असे अनेक आरोग्याच्या समस्या उध्दभवतात. बालपणी मिळणारा योग्य तो पोषक आहार या महिलेचे पुढील आयुष्य व आरोग्य ठरवत असतो. आज जी कुपोषणाची समस्या संपूर्ण देशाला भेडसावत आहे, त्यातून महिलांची सुटका झालेली नाही. गर्भाचे नीट पोषण झाले नाही तर जन्माला येणारी बालिकाही कमी वजनाची आणि कुपोषित अशीच जन्माला येणार. तिची आईदेखील कुपोषित असली तर त्यामातेचे दूध नवजात बालिकेला नीट मिळत नाही. मग या बालिकेची पूर्ण वाढ कशी होणार? तिच्या शरीराची प्रतिकार शक्ती कशी विकसित होणार? गर्भाचे नीट पोषण न होणे, पुढे मातेचे दूध योग्य तेवढे न मिळणे, बालिका थोडी मोठी झाली की तिच्या शरीराच्या वाढीला आवश्यक असणारा योग्य तेवढा आहार न मिळणे यामुळे बालपणी ती बालिका खुरटलेली राहते. हे सर्व थांबवायचे असेल तर महिलांमध्ये फार मोठ्या प्रमाणावर त्याच्या आरोग्याविषयी जागृती निर्माण करावी लागेल. घरातील गृहिणींचे आरोग्य जर उत्तम असेल तर ती इतरांकडे नीटपणे लक्ष देऊ शकते. त्यासाठी

  1. सर्व महिलांनी योग्य तेवढा व्यायाम, योगासने करण्याचीही गरज असते. हे त्यांनी विचारात घ्यायला हवे.
  2. मनाचे आरोग्य जपण्यासाठीही आवश्यक ते सर्व प्रयत्न महिलांनी करावेत.
  3. शतावरी ज्येष्ठमध, चंदन, भुईकोहळा, कोरपड, आवळा अशा काही वनौषधी महिलांनी नेहमी बाळगाव्यात आणि त्यांचा योग्य तो उपयोगही करावा. या वनौषधी सहज उपलब्ध होणाऱ्या अशा आहेत.
  4. खजूर, अंजीर, केळी, द्राक्षे, डाळिंब अशा काही फळांचा उपयोग त्यांनी आहारात ठेवावा.
  5. बाजरीची भाकरी आणि शरीराला आवश्यक असणाऱ्या योग्य भाज्यांचा समावेश आहारात महिलांनी करावा.
  6. कॅल्शिअम शरीरातील सर्वात मुख्य खनिजं असून ते हाडांची मजबुती व शरीराच्या निर्मितीसाठी आवश्यक असते… हे शेंगदाणे, तीळ, दूध, खोबरं, मुळा, कोबी, ज्वारी, राजगिरा, खरबूज, खजूर या सर्वात असते…
  7. नियमित इलायचीचे सेवन केल्यास अस्थमा, खोकला, ताप आणि फुप्फुसाशी निगडित आजारा मध्ये फायदा होतो.
  8. रात्री जेवण कमी करावं आणि फळं खावीत… सोबतच योग्य वेळी जेवणाची सवय लावाल, तर लठ्ठपणा कमी करण्यात मदत होईल.
  9. वयानुसार आपलं शरीर बदलतं, पण ते बिघडू देऊ नये… आपलं रुटीन नियमित फॉलो केलं पाहिजे… वय वाढलं म्हणून व्यायाम कमी करण्याची गरज नाही.
  10. आजच्या काळातील स्त्री हि नोकरी करणारी आहे. घरातील सर्व काम बघून त्या बाहेरचे कामकाज देखील बघतात. त्यामुळे त्याच्या शरीराविषयी अनेक तक्रारी उध्दभवत असतात. नोकरी करणाऱ्या स्त्रियांच्या आरोग्य व सौंदर्य यावर घाला घालणाऱ्या मायग्रेन, कंबर, पाठदुखी, फ्रोझन शोल्डर यासारख्या अनेक विकरांची कारणे यात असतात. अश्या नोकरीवर जाणाऱ्या स्त्रियांनी आपल्या शरीराची पुरेपूर काळजी घेणे आवश्यक आहे.
  11. आपण काम करताना ज्या खूर्चीवर बसतो, ती आपल्या कंबरेखालील भागास आधार देणारी हवी. आपल्या कंबरेस जर आधार मिळत नसेल, तर कुशन ठेवून तो द्यावा.
  12. जेवण गरम राहील अशा टिफिनमध्ये न्यावे. यात हिरव्या भाज्या, दही डाळ इ. समावेश असावा.
  13. महिलांनी सारखा चहा, कॉफीवर जोर देवू नये. तसेच चहाबरोबर खाण्यास मोडावलेली कडधान्ये (उदा. मूग,मटकी, सोयाबीन्स्‌) न्यावीत.
  14. काँप्युटरवर वा टाइपरायटरवर काम करणार्याज स्त्रियांनी नेहमी लक्षात ठेवावे की, हातांना खूप ताण बसून देऊ नये. हात थोडे ढिले सोडून व हलक्या हातानेच टाइप करावे.
  15. जेव्हा बसाल, तेव्हा आपली कंबर, गुडघे, पायांच्या पोटर्यार यावर दाब पडेल, अशा प्रकारे बसणे टाळावे. हात व पायांची बोटे हालत राहतील, असे काम करावे.

हे ही वाचा :

जाणून घ्या… बदाम खाण्याचे फायदे

ग्रीन टी मुळे शरीरावर होतील दुष्पपरिणाम

Pitrupaksh shradh 2022 :- जाणून घ्या… श्राद्धाचे अनेक प्रकार

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version