वर्ल्ड मॉस्किटो डे : तारीख, इतिहास आणि उपाय

20 ऑगस्ट ही तारीख जागतिक डास दिवस ओळखला जातो

वर्ल्ड मॉस्किटो डे : तारीख, इतिहास आणि उपाय

world mosquito day

20 ऑगस्ट ही तारीख जागतिक डास दिवस ओळखला जातो. हा दिवस ब्रिटीश डॉक्टर सर रोनाल्ड रॉस यांना सन्मानित करण्यासाठी आणि मान्यता देण्यासाठी चिन्हांकित केला जातो. सर रोनाल्ड रॉस यांनी 1897 मध्ये मलेरियासाठी मादी डास जबाबदार असल्याचे शोधून काढले. लंडन स्कूल ऑफ हायजीन अँड ट्रॉपिकल मेडिसिनतर्फे दरवर्षी जागतिक डास दिन साजरा केला जातो.

डासांपासून होणा-या रोगांचा विचार केला तर मलेरियाचा जागतिक प्रभाव सर्वात जास्त आहे. वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन (WHO) च्या मते, केवळ मलेरियामुळे दरवर्षी 400,000 लोकांचा मृत्यू होतो. इतर डासांमुळे होणारे रोग जरी प्राणघातक नसले तरी रुग्णांवर त्याचे घातक परिणाम होऊ शकतात. उदाहरणार्थ, चिकनगुनियामुळे सांधेदुखीचा त्रास होतो आणि गर्भवती महिलांमध्ये झिका संसर्गामुळे गंभीर जन्मदोष होऊ शकतात.

जागतिक मच्छर दिवस का साजरा केला जातो?

डास हा जगातील सर्वात प्राणघातक कीटकांपैकी एक आहे. त्यांच्यामुळे दरवर्षी लाखो मृत्यू होतात. त्यामुळे डासांमुळे होणाऱ्या रोगांचे कारण आणि प्रतिबंध याबाबत जनजागृती करण्यासाठी हा दिवस साजरा केला जातो. एडिस, अॅनोफिलीस आणि क्युलेक्स डास हे वाहक म्हणून काम करतात आणि भारताच्या राष्ट्रीय आरोग्य पोर्टलनुसार अनेक रोगांचा प्रसार करतात.

डासाचे स्वतःचे गुंतागुंतीचे जीवन चक्र असते. जरी वेगवेगळ्या डासांच्या प्रजाती वेग्वेगळ्या ठिकाणी अंडी घालत असल्या तरी अनेक अॅनोफिलीस डास त्यांची अंडी पाण्याच्या स्तब्ध तलावांमध्ये घालतात. जिथे अंड्यांना उबण्यासाठी अनुकूल वातावरण मिळते आणि त्या अंड्याचीवाढ भरभर होते.

प्रौढ नर आणि मादी अॅनोफिलीस मकरंद खाऊन जगतात. मात्र, मादी रक्त देखील खातात (परिणामी डास चावतात) कारण रक्तातील पोषक घटक मादींना अंडी तयार करण्यास मदत करतात.

डासांपासून वाचण्यासाठी काही घरगुती आणि प्रभावी उपाय:

कापूर

कापूर

कापूर हा एक नैसर्गिक घरगुती उपाय आहे जो तुमच्या सभोवतालच्या डासांपासून मुक्त होण्यासाठी एक उत्तम उपाय ठरू शकतो. त्याचा तीव्र वास डासांना दूर नेतो. बंद खोलीत कापूर पेटवून सुमारे ३० मिनिटे ठेवल्यावर घरातील डास लगेच पळून जातील.

लसूण

लसूण

लसणात अनेक गुणधर्म असतात जे डासांना दूर ठेवण्यास मदत करतात. त्यामुळे लसणीच्या काही पाकळ्या कुस्करून पाण्यात उकळवूं घ्या आणि नंतर हे द्रावण एका स्प्रे बॉटलमध्ये भरून घरभर त्याची फवारणी करा. या द्रावणामुळे घरातील डास पटकन मरतील आणि घरातील लसणीच्या वासामुळे डास घराच्या आसपास देखील फिरकणार नाहीत.

कॉफी ग्राउंड्स

कॉफी ग्राउंड्स

कॉफी ग्राउंड्स प्रत्येक घरात सहज उपलब्ध असतात आणि डासांपासून मुक्त होण्यासाठी हा एक उत्तम घरगुती उपाय आहे. घराभोवती साचलेल्या पाण्यामुळे आजूबाजूला डासांची संख्या वाढण्यास मदत होते, म्हणून घरासभोवतालच्या साचलेल्या पाण्यात कॉफी ग्राउंड ओतल्यास डासांची ही संख्या कमी होण्यास मदत होऊ शकते. कारण, कॉफी ग्राउंड्समुळे डासांची अंडी पृष्ठभागावर येतात आणि ऑक्सिजन नसल्यामुळे मरतात.

लॅव्हेंडर तेल

लॅव्हेंडर तेल

डास लॅव्हेंडर तेलाचा वास सहन करू शकत नाहीत म्हणून घराभोवती आणि आजूबाजूच्या परिसरात लॅव्हेंडर तेलाची फवारणी करून डासांना दूर ठेवता येते. तसेच थोडेसे लॅव्हेंडर तुम्ही तुमच्या अंगालाही लावू शकता.

पुदिना

पुदिना

डासांना पुदिन्याच्या वासाचा तिरस्कार असतो. त्यामुळे त्याचा वापर सभोवतालच्या डासांना रोखण्यासाठी केला जाऊ शकतो. ताजी पुदीनाची पाने किंवा पुदीना तेलाचा वापर केला जाऊ शकतो. तसेच घरी पुदिनाचे झाड लावल्यास डासांना दूर ठेवता येते.

हे ही वाचा:

मानवी मनोरे रचून त्यावर शिवाजी महाराज – अफजल खान भेटीचे दृश्य

Exit mobile version