spot_img
Saturday, September 21, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

Yoga in winter हिवाळयात ‘ही ‘ योगासने करा, हाडांचे दुखणे होईल दूर

नियमितपणे योगासने केल्याने आरोग्याला अनेक फायदे होतात. योगासने केल्याने अनेक आजरांच्या समस्यांवर सुटका मिळते. हिवाळा म्हटल्यावर सांधेदुखी उद्भवते. ज्यांना आधीपासूनच सांधेदुखी आहे, त्यांना तर हिवाळयात अजूनच त्रास होतो. म्हणून हिवाळयात आरोग्याची काळजी घेणे फार महत्वाचे आहे. तर आज आम्ही तुम्हाला या बातमीमधून हाडांचे दुखणे (Bone pain) कमी करण्यासाठी काही योगासने बद्दल सांगणार आहोत.

रोज योगासने करणे आरोग्यासाठी खूप महत्वाचे आहे. योगासनामुळे मन, शरीर आणि श्वास यांचे एकमेकांशी संतुलन राखले गेल्याने जीवनाचा प्रवास शांत, आनंदी निट होतो. तसेच शरीर तंदुरूस्त राखण्यास मदत होते. तसेच काहीजणांना योगासने करायला खूप आवडतात. आजकालच्या तरुणपिढीसाठी योगासने करणे खूप फायदेशीर आहे. नियमित योगा केल्यामुळे शारीरिक आणि मानसिक आरोग्य वाढतं. तुम्ही आजकालच्या धावपळीच्या जीवनात स्वतःला फिट ठेवण्यासाठी हा चांगला पर्याय आहे. शरीर निरोगी राहण्यासाठी योगासने करणे गरजेचे आहे. पण योगासने करताना काही गोष्टीची काळजी घेतली पाहिजे.

पादहस्तासन (Uttanasana) :

पादहस्तासन (Uttanasana) योगासन केल्याने हृदय मजबुत होण्यास मदत होते. त्यामुळे हृदयाचा रक्तप्रवाह सुरळीत राहतो. तसेच पोटाची चरबी देखील कमी होते, आणि पोटाच्या अनेक विकारांपासून आराम मिळतो. आणि उंची वाढण्यास देखील मदत होते.

अधोमुख श्वानासन (Downward Shvanasana) :

अधोमुख श्वानासन योगासन केल्याने पचनसंस्था सुधारण्यास मदत होते. हे योगासन केल्याने पोटाच्या खालच्या भागाचे स्नायू मजबूत होते. या बरोबरच आपल्या पाठीचा कणा देखील मजबूत होतो. हा योगासन शरीरासाठी खूप चांगला आहे तसेच या योगासनामुळे रक्तभिसरण देखील सुधारते. हे योगासन केल्याने हातापायांचे दुखणे थांबते. आणि शरीराला खूप आराम देखील मिळतो.

चक्रासन (chakrasana) :

चक्रासन योगासन केल्याने वजन कमी होण्यास मदत होते. त्यामुळे शरीर लवचिक असते. याचे फायदे मधुमेहाच्या रुग्नांना खूप होतात. तसेच यामुळे पाठीचा कणा देखील सरळ होतो.

हे ही वाचा : 

उद्धव ठाकरेंच्या आरोपाला दीपक केसरकारांचं प्रतिआरोप

सोनम कपूरने मुंबईतील घरातील काही फोटो केले शेअर ; ड्रेस पाहून चाहत्याना बसला आश्चर्याचा धक्का

Follow Us
टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss