spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

तुमच्या मुलांचा स्क्रीन टाइम वाढतोय?

आताचा काळ हा डिजिटल काळ आहे. आज काल लहानापासून मोठ्यांपर्यत प्रत्येकाच्या हातामध्ये मोबाइल हा पाहायला मिळतोच.आजच्या काळात टीव्ही, व्हिडिओ गेम्स, आयपॅड, कॉप्युटर आणि बरेच काही आपण रोजच्या जीवनात वापरात असतो. त्यांचा स्क्रीन टाइम दिवसेंदिवस वाढत चाल्ला आहे. आजकाल लहान मुले ही दिवस दिवस भर व्हिडिओ गेम्स, सोशल मीडिया यावर त्यांचा वेळ वाया घालवत असतात.जसजसा स्क्रीन टाईम वाढत जातो तसतसा लहान मुलांमध्ये ऑटोझमशी (Autism) निगडित लक्षणे वाढत जातात. जर पालकांनी काही महिन्यांसाठी जर स्क्रीन टाइम कमी केला तर ऑटिझमची लक्षणे दूर होण्याची शक्यता आहे. हि जी लक्षणे आहेत ती व्हर्च्युअल ऑटीझम (Virtual autism) म्हणून ओळखला जातो. आणि ऑटिझम हा संगणकाच्या द्वारे आणला जातो.

पूर्वीची जी लहान मुले होती ती मैदानी खेळ किंवा बैठी खेळ खेळण्यांमध्ये रस होता. परंतु आताच्या लहान मुलांना व्हिडिओ गेम्स, टीव्ही, सोशल मीडिया यामध्ये जास्त रस आहे. आजकालची शिक्षण पद्धती (Education) सुद्धा डिजिटल झाली आहे. त्यामुळे मुलांचा स्क्रीन टाइम वाढला आहे. त्यामुळे असामान्य वर्तन मानसिक आणि भाषिक विकास कमी होतात आणि त्यामुळे अजून बरीच लक्षणे दिसून येतात. आपली मुले जर दररोज चार किंवा त्याहून अधिक तास गॅजेट्सचा वापर करत असतील तर अश्या पालकांना सावधान राहावे. डिजिटल जगामध्ये जास्त वेळ घालवल्याने आपल्या मुलांवर मेंदूचे दुष्परिणाम होऊ शकतात. त्यामुळे तोंडाची बोबडी वळते आणि मानसिक समस्या उद्धभवतात.

मुलांचा स्क्रीन टाइम वाढल्यावर मेलॅटोनीन (Melatonin) आणि डोपामाइनच्या उत्पादन वाढीस कारणीभूत ठरते. मुलांच्या झोपेवर परिणाम होतो. झोपेसाठी संघर्ष करावा लागतो. लोकांशी संवाद साधण्यात अडचण येते त्यामुळे समोरच्या व्यक्तीची चिडचीड होऊन त्या व्यक्तीला राग येऊ शकतो. यातून निर्माण होणाऱ्या रागाला नातेसंबंधांना हानी पोहचू शकते आणि त्यामुळे स्वाभीमान ही कमी होऊ शकतो. मुलाच्या मूलभूत गरज पुरवणे व त्याचा आदर करणे महत्वाचे आहे. मुलांनी संवाद साधने, सहानुभूती दाखवणे हि कौशल्ये (skills) आत्मसात करणे महत्वाचे आहे. पालकांनी दररोज मुलांनी संवाद साधला पाहिजे. मुलांनी त्याच्या वाढीसाठी आणि आरोग्यासाठी आवश्यक असलेल्या अतिरिक्त क्रियाकलापाइंममध्ये भाग घेणं गरजेचे आहे. मुलाच्या चांगल्या आरोग्यच्या साठी आणि विकासासाठी त्यांना गॅजेट्सपासून दूर ठेवणं योग्य राहील. त्यामुळेच त्यांचा विकास होईल.

हे ही वाचा:

दात दुखीच्या समस्येपासून आहेत त्रस्त तर अश्या प्रकारे घ्या काळजी

मेथी ही आरोग्यासाठी किती फायदेशीर आहे?

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss