Saturday, June 29, 2024

Latest Posts

Zika Virus चा पुण्यात शिरकाव, काय आहेत लक्षणे?

पावसाळा आला की अनेक आजार डोकं वर काढत असतानाच महाराष्ट्रातील पुणे या शहरात झिका व्हायरसचे दोन रुग्ण आढळले आहेत. हे दोन्ही रुग्ण एरंडवने भागातील असून त्यांची रक्ताची चाचणी केली असता त्याचा अहवाल हा पॉसिटीव्ह आला आहे.

पावसाळा आला की अनेक आजार डोकं वर काढत असतानाच महाराष्ट्रातील पुणे या शहरात झिका व्हायरसचे दोन रुग्ण आढळले आहेत. हे दोन्ही रुग्ण एरंडवने भागातील असून त्यांची रक्ताची चाचणी केली असता त्याचा अहवाल हा पॉसिटीव्ह आला आहे. डॉक्टर आणि त्यांच्या मुलीला झिका व्हायरसची लागण झाली आहे. त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे सांगण्यात येत असले तरी यामुळे महाराष्ट्रात तणाव वाढला आहे. तसेच पुण्यातील मुंढवा भागातील एका ४७ वर्षीय महिलेचा रक्त चाचणीचा अहवाल पॉसिटीव्ह आला आहे. त्यामुळे पुण्यात झिकाचा धोका वाढताना दिसत आहे.

झिका हा व्हायरस एडिस डास चावल्यामुळे पसरतो. डेंग्यू आणि चिकनगुनिया यासारख्या संसर्ग पसरवण्यासाठी देखील या डासांसारखीच प्रजाती जबाबदार मानली जाते. एखाद्या निरोगी व्यक्तीला झिका बाधित डास चावतो, त्या व्यक्तीला संसर्ग होतो. ताप येणे, त्वचेवर पुरळ येणे, डोळ्यातील बुबुळाच्या भागांमध्ये जळजळ होणे, स्नायू दुखी, सांधे दुखी, अस्वस्थता व डोकेदुखी ही झिका व्हायरस रुग्णाची प्रमुख लक्षणे आहेत. झिका विषाणूची लागण झालेल्या व्यक्तीचे रक्त पिल्याने डासांना झिका विषाणूची लागण होते, हेच डास अन्य व्यक्तींना चावल्यास त्यांना झिकाची लागण होते. पावसाळ्यामध्ये साचलेल्या पाण्यामुळे डासांची संख्या वाढते. परिसरात इतर कोणतेही संशयित रुग्ण नसले तरी गर्भवती महिलांच्या आरोग्यावर विशेष लक्ष ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. एखाद्या गर्भवती महिलेला संसर्ग झाला असेल तर तिच्या गर्भातील बाळावर त्याचा परिणाम होऊ शकतो. आरोग्य अधिकाऱ्यांनी डासांची उत्पत्ती रोखण्यासाठी खबरदारीच्या उपाययोजना करण्यास सुरुवात केली आहे अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे. संसर्गाचे मूळ कारण शोधले नाही तर संसर्गाचा धोका अधिक वाढल्याची भीती वर्तवण्यात आली आहे.

१९४७ साली पहिल्यांदा युगांडामध्ये हा व्हायरस सापडला होता. तसेच आफ्रिका, अमेरिका आणि दक्षिण भारतातही आढळतो. पुण्यात आतापर्यंत जे रुग्ण पॉसिटीव्ह सापडले आहेत त्यांनी कुठे ना कुठे प्रवास केला होता किंवा ते कोणाच्या तरी संपर्कांत आले होते. मात्र सापडलेल्या रुग्णाच्या संसर्गाची साखळी अद्याप सापडलेली नाही. वारीच्या तोंडावर झिका व्हायरसचे तीन रुग्ण आढळल्याने मोठी चिंता व्यक्त होत आहे. ३० जून आणि १ जुलै ला पालकी सोहळा शहरात दाखल होणार आहेत. या पालखी सोहळ्यासाठी वारकरी तसेच भाविकांची मोठ्या प्रमाणात गर्दी होणार आहे. त्यात या झिकाच्या वाढत्या प्रादुर्भावाने चिंता वाढली आहे. झिकाचे रुग्ण सापडल्याने अधिक काळजी घेणे गरजेचे आहे, असे आरोग्य विभागाने सांगितले आहे.

हे ही वाचा:

राज्यात अमली पदार्थ विरोधात शासनाचे ‘झिरो टॉलरन्स’ धोरण – Devendra Fadnavis

अर्थसंकल्प केवळ शब्दांचा फुलोरा, शरद पवार यांचा हल्लाबोल

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss