spot_img
Thursday, September 19, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

काँग्रेसच्या बड्या नेत्याने केलं वक्तव्य, जागावाटपावरून महायुतीत गडबड, भांडण…

राज्यात लवकरच लोकसभा निवडणुका जाहीर होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. या लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज्यात अनेक घडामोडींना वेग हा आला आहे.

Lok Sabha Elections 2024 : राज्यात लवकरच लोकसभा निवडणुका जाहीर होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. या लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज्यात अनेक घडामोडींना वेग हा आला आहे. राज्यात कोणती जागा कोण लढवणार अश्या अनेक चर्चाना उधाण आलं आहे. लोकसभेच्या जागा वाटपावरून (Lok Sabha Election 2024) शिवसेना (Shiv Sena) आणि भाजपामध्ये (BJP) वाद होण्याची चिन्हे सध्या दिसत आहेत. आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीत जागावाटपावर सध्या चर्चा सुरु आहे. यासाठी केंद्रीय नेतृत्वाचं विशेष लक्ष असल्याचं दिसत आहे. याच मुद्याला धरून काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी महायुतीवर (Mahayuti) निशाणा साधला आहे.

महायुतीच्या जागावाटपाबाबत बोलतांना नाना पटोल म्हणाले की, “जागावाटपावरून महायुतीत गडबड सुरू आहे, महाविकास आघाडीत कोणतीही गडबड नाही. आता तर महायुतीत भांडण सुरू झाले आहे. भविष्यात फारच भयानक परिस्थिती होणार आहे. महाविकास आघाडी योग्यवेळी जागा जाहीर करेल. महायुतीत काय व्हायच ते होईल, त्यांना सत्तेची मस्ती आहे. जनतेचे प्रश्न वाऱ्यावर आहे, धान खरेदी नाही, पेपरफुटी सुरू आहे, सरकार त्यावर काही करत नाही. हुशार मुलांचं नुकसान सुरू आहे, असे नाना पटोले म्हणाले.

 

पुढील काही दिवसांत कोणत्याही क्षणी लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागण्याची शक्यता आहे. असे असतांना जागावाटपासाठी महायुतीच्या बैठका वाढली आहे. स्वतः भाजप नेते अमित शाह यांच्या उपस्थितीत देखील बैठका झाल्या. महाराष्ट्रातील जागावाटपासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह महाराष्ट्र दौऱ्यावर होते. अमित शाह यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्यासोबत बंद दाराआड चर्चाही केली.

 

हे ही वाचा:

मनोज जरांगे यांच्यावर गुन्हा दाखल, त्यांच्यावर आतापर्यंत पाच गुन्हे दाखल

महाशिवरात्रीनिमित्त महादेवाचे दर्शन घ्यायचे असेल,तर भेट द्या महाराष्ट्रातील ‘या’ मंदिरांना

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss