spot_img
Sunday, September 8, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

काहीतरी काय विचारताय,अधिवेशनाचा विषय आहे त्यावर विचारा; विधानसभेतील गोंधळावर एकनाथ शिंदेनी दिले उत्तर

विधानसभेत शेवटच्या दिवशी झालेल्या गोंधळामुळे राजकीय वर्तुळात अनेक चर्चांना उधाण आले आहे.

विधानसभेत शेवटच्या दिवशी झालेल्या गोंधळामुळे राजकीय वर्तुळात अनेक चर्चांना उधाण आले आहे. निवडणुकीच्या तोंडावर शिवसेना शिंदे गटाच्या आमदारामंध्ये धक्काबुक्की झाल्याचे समोर आले आहे. शिवसेनेमधील मंत्री दादा भुसे (dada bhuse) आणि आमदार महेंद्र थोरवे (mahendra thorve) यांच्यामध्ये धक्काबुकी झाली. या दोघांमधील वाद मंत्री शंभूराज देसाई आणि शिवसेना प्रवक्ते भरत गोगावले यांनी मध्यस्थी पडून वाद सोडवला. त्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या दोन्ही आमदारांची समजूत काढली. मात्र सभागृहात झालेल्या धक्काबुकीवर एकनाथ शिंदे यांनी प्रतिक्रिया देणं टाळलं आहे.

मंत्री दादा भुसे आणि महेंद्र थोरवे यांच्यामध्ये झालेल्या धक्काबुकीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेनी प्रतिक्रिया देणं टाळलं आहे. मीडियासमोर आल्यानंतर एकनाथ शिंदे रागारागात निघून गेले. पत्रकारांनी प्रश्न विचारल्यानंतर एकनाथ शिंदे म्हणाले, काहीतरी काय विचारताय. अधिवेशनाचा विषय आहे त्यावर विचारा. शिवसेनेचे मंत्री शंभूराज देसाई यांनी वाद झालाच नाही, असा दावा केला आहे. एकनाथ शिंदे यांनी सभागृहातून बाहेर आल्यानंतर दादा भुसे आणि महेंद्र थोरात यांच्यासोबत चर्चा केली. त्यानंतर त्यांच्याकडील कागदपत्र पहिली.त्यांनी दोघांमध्ये समजूत घालण्याचा प्रयत्न केला.

शंभूराज देसाई म्हणाले, बोलताना कोणाचा आवाज वाढला, वाद झाला असं काही नाही. योगयायोगाने मी तिथे होतो. मला समजलं उंच आवाजामध्ये बोलले जात आहे तेव्हा त्यांना आम्ही दोघे लॉबीमध्ये घेऊन गेलो. तिथे गेल्यानंतर आमदार महोदय आणि त्यांचा विषय मला सांगितला आणि आमदार साहेबांचं काम कसे मार्गी लावता येईल हे पाहिलं. त्यामुळे एकमेकांच्या अंगावर जाण असं काही घडलं नाही. दोघांमध्ये चिडाचिडी झालेली नाही, कोणी कोणाच्या अंगावर धावून गेलं नाही. आमदारांची जी काम आहेत त्यावर चर्चा करून आम्ही तोडगा काढू. त्यांची जी काम आहेत ती सगळी मार्गी लावली जातील. माध्यमांनासुद्धा माझी हात जोडून विनंती आहे माध्यम प्रतिनिधी आतमध्ये येत नाहीत. त्यांनी खात्री केल्यानंतरच बातमी चालवावी. मी सभागृहामध्ये होतो. माझंसुद्धा सभागृहात कामकाज आहे. पण ज्यावेळेस मला समजलं दोन आमदार आपापसात भिडल्याचे माध्यमांवर दाखवले जात आहे हे पाहून मी सभागृहातील कामकाजातून बाहेर येऊन वस्तुस्थिती सांगत आहे. तुम्ही जे सांगतंय तास बिलकुल काही घडलेलं नाही, असे शंभूराज देसाई म्हणाले.

हे ही वाचा:

आरक्षणाच्या मागणीसाठी गावागावात व्हॉट्सअप ग्रुप तयार करावे, मनोज जरांगेंच्या सूचना

विधिमंडळाच्या लॉबीमध्ये गोंधळ, शिंदे गटाच्या आमदारांमध्ये धक्काबुकी

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss