निवडणूक आयोगाच्या बैठकीनंतर आचारसंहिता लागण्याची शक्यता, १५ मार्चला आयोगाची महत्वाची बैठक

देशभरात आगामी लोकसभा निवडणुकीची (Lok Sabha Elections) जोरदार तयारी केली जात आहे.

निवडणूक आयोगाच्या बैठकीनंतर आचारसंहिता लागण्याची शक्यता, १५ मार्चला आयोगाची महत्वाची बैठक

देशभरात आगामी लोकसभा निवडणुकीची (Lok Sabha Elections) जोरदार तयारी केली जात आहे. सर्वच पक्षातील नेत्यांनी निवडणुकीची तयारी केली आहे. त्यातच आता १८ मार्च किंवा त्यानंतर लोकसभा निवडणूक जाहीर होण्याची शक्यता आहे. याच पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाची (Election Commission Of India) १५ मार्चला महत्वाची बैठक होणार आहे. या बैठकीमध्ये केंद्रीय निवडणूक आयुक्तांच्या रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. त्यानंतर १८ मार्च (सोमवारी) आचारसंहिता लागू होण्याची शक्यता आहे.

निवडणूक आयुक्त अनूप चंद्र पांडे यांनी अचानक घेतलेली निवृत्ती आणि निवडणूक आयुक्त अरुण गोयल यांनी दिलेल्या राजीनाम्यानंतर लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर देशाच्या निवडणूक आयुक्तांच्या दोन जागा रिक्त झाल्या आहेत. या दोन रिक्त जागा भरण्यासाठी १५ मार्चला महत्वाची बैठक पार पडणार आहे. केंद्रीय कायदा मंत्री अर्जुन राम मेघवाल यांच्या अध्येतेखाली निवडणूक आयोगाच्या नियुक्तीसाठी समिती स्थापन करण्यात आली आहे. या दोन रिक्त पदांसाठी पाच नावांचे दोन स्वतंत्र पॅनेल बनवण्यात आले आहेत. गृह सचिव आणि कार्मिक आणि प्रशिक्षण विभागाचे (DOPT) सचिव यांचा या समितीमध्ये सहभाग आहे. केंद्रीय मंत्री आणि लोकसभेतील विरोधी पक्ष नेते अधीर रंजन चौधरी यांची पंतप्रधानांच्या अध्यक्षतेखालील निवड समिती, निवडणूक आयुक्त म्हणून नियुक्तीसाठी दोन व्यक्तींची नवे देण्यात आली आहेत. त्यानंतर राष्ट्र्पती निवडणूक आयुक्तांची नियुक्ती करणार आहेत.

१५ मार्चला केंद्रीय निवडणूक आयोगाची महत्वाची बैठक होणार आहे. त्यानंतर शनिवार आणि रविवार सुट्टीचा वार असल्याने सोमवारी किंवा १८ मार्चनंतर आचारसंहिता लागू होण्याची शक्यता आहे. लोकसभा निवडणूक जाहीर होण्यासाठी अवघे काही दिवस उरले आहेत. केंद्रीय निवडणूक आयुक्त अरुण गोयल यांनी दिलेल्या राजीनाम्यानंतर राजकीय वर्तुळात अनेक चर्चांना उधाण आले होते. केंद्रीय निवडणूक आयोगामध्ये एकूण तीन आयुक्त असतात. त्यातील एक पद रिकामे होते. एक मुख्य आयुक्त आणि त्यांना सहाय्य करण्यासाठी इतर दोन आयुक्त असतात. मात्र अरुण गोयल यांनी राजीनामा दिल्यानंतर दोन्ही पद रिक्त झाली.

हे ही वाचा:

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते कोस्टल रोडचे आज उद्घाटन, शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्यांनासुद्धा आमंत्रण

लोकसभा निवडणुकीपूर्वी सत्ताधारी पक्षांकडून विकास कामांचे लोकार्पण, लवकरच आचारसंहिता लागण्याची शक्यता

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा. 

Exit mobile version