विधिमंडळाच्या लॉबीमध्ये गोंधळ, शिंदे गटाच्या आमदारांमध्ये धक्काबुकी

विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा आज शेवटचा दिवस आहे.

विधिमंडळाच्या लॉबीमध्ये गोंधळ, शिंदे गटाच्या आमदारांमध्ये धक्काबुकी

विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा आज शेवटचा दिवस आहे. या शेवटच्या दिवशी अधिवेशात जोरदार राडा झाला आहे. विधिमंडळाच्या लॉबीमध्ये शिवसेना शिंदे गटाच्या आमदारांमध्ये हाणामारी झाली. या सर्व गोंधळामध्ये राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. मंत्री दादा भुसे आणि रवींद्र थोरवे यांच्यात धक्काबुकी झाली. या धक्काबुकीनंतर सगळीकडे एकच खळबळ उडाली आहे. त्यानंतर मंत्री शंभूराज देसाई आणि भरत गोगावले यांनी मध्यस्थी केली. त्यामुळे आता विधानसभेमध्ये पोलीस लावण्याची वेळ आल्याची प्रतिक्रिया विधानसभेचे विरोधी पक्षनेते जितेंद्र आव्हाड यांनी दिली आहे. हा सर्व वाद मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना समजल्यानंतर महेंद्र थोरवे आणि दादा भुसे यांना एकत्र कार्यालयात बोलावून घेतले.

विधानसभेत झालेल्या वादानंतर शिंदे गटातील आमदार आणि मंत्र्यांकडून वाद झालाच नाही, असा दावा करण्यात आला आहे. मध्यस्थी करण्यासाठी धावलेल्या शंभूराज देसाई यांनी हा वाद झाल्याचा पुरावा काय? असा प्रश्न देखील केला आहे. बोलताना पुढे म्हणाले, बोलताना कोणाचा आवाज वाढला, वाद झाला असं काही नाही. योगयायोगाने मी तिथे होतो. मला समजलं उंच आवाजामध्ये बोलले जात आहे तेव्हा त्यांना आम्ही दोघे लॉबीमध्ये घेऊन गेलो. तिथे गेल्यानंतर आमदार महोदय आणि त्यांचा विषय मला सांगितला आणि आमदार साहेबांचं काम कसे मार्गी लावता येईल हे पाहिलं. त्यामुळे एकमेकांच्या अंगावर जाण असं काही घडलं नाही. माध्यमांनासुद्धा माझी हात जोडून विनंती आहे माध्यम प्रतिनिधी आतमध्ये येत नाहीत. त्यांनी खात्री केल्यानंतरच बातमी चालवावी. मी सभागृहामध्ये होतो. माझंसुद्धा सभागृहात कामकाज आहे. पण ज्यावेळेस मला हे सगळं समजलं म्हणून मी सभागृहातील कामकाजातून बाहेर येऊन वस्तुस्थिती सांगत आहे, असे शंभूराज देसाई म्हणाले.

 

विधानसभेत वाद झाल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची काही प्रमाणात चिडचिड झाली होती. सभागृहात घडलेल्या वादाबद्दल विचारल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी उत्तर देण्यास टाळले. एकनाथ शिंदे म्हणाले, असे काही तरी काय विचारताय? अधिवेशनातील कामांबद्दल विचारा, अशी प्रतिक्रिया एकनाथ शिंदेनी दिली. मात्र विधानसभेत घडलेल्या या वादामुळे विरोधी पक्षांनी सत्ताधारी पक्षावर जोरदार टीका केली आहे.

हे ही वाचा:

आरक्षणाच्या मागणीसाठी गावागावात व्हॉट्सअप ग्रुप तयार करावे, मनोज जरांगेंच्या सूचना

आंगणेवाडीच्या यात्रेसाठी लावलेले मुख्यमंत्र्यांचे बॅनर अज्ञाताने फाडले

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version