spot_img
Thursday, September 19, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

काँग्रेसचं ठरलं!, मुंबई सोडून राज्यात ‘इतक्या’ जागा लढवण्याची काँग्रेसची तयारीत…

लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज्यात अनेक घडामोडींना वेग हा आला आहे. राज्यत कोणती जागा कोण लढवणार अश्या अनेक चर्चाना उधाण आलं आहे.

लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज्यात अनेक घडामोडींना वेग हा आला आहे. राज्यत कोणती जागा कोण लढवणार अश्या अनेक चर्चाना उधाण आलं आहे. अश्यातच आता राज्यातील महाविकास आघाडीची (Maha Vikas Aghadi) जागावाटपाची चर्चा अंतिम टप्प्यात आली आहे. तर दिनांक ९ मार्च रोजी उमेदवारांची नाव जाहीर होतील अशी शक्यता देखील मोठ्या प्रमाणात वर्तवली जात आहे. तर काँग्रेस पक्ष देखील चांगलाच ऍक्शन मोड मध्ये आला आहे. उमेदवारांची नाव निश्चित करण्यासाठी आज काँग्रेस निवडणूक समितीची बैठक बोलावण्यात आली आहे.

कोणत्या मतदारसंघात काँग्रेसने कोणाच्या नावाची चाचपणी केली ?

  • गडचिरोली- नामदेव उसेंडी, नामदेव किरसान
  • भंडारा-गोंदिया- सर्व अधिकार नाना पाटोले यांना
  • यवतमाळ-वाशीम- शिवाजीराव मोघे, माणिकराव ठाकरे, जीवन पाटील
  • चंद्रपूर- प्रतिभा धानोरकर, विजय वडेट्टीवार, सुभाष धोटे
  • हिंगोली- प्रज्ञा सातव
  • नांदेड- वसंतराव चव्हाण, आशा शिंदे
  • रामटेक- रश्मी बर्वे, कृणाल राऊत, राजू पारवे, किशोर गजभिये
  • नागपूर – विकास ठाकरे, अभिजित वंजारी, प्रफुल गुलधे
  • अमरावती- बळवंतराव वानखेडे, किशोर बासेकर
  • अकोला- डॉ अभय पाटील, अशोक आमणकर
  • लातूर – सर्वस्वी अधिकार अमित देशमुख यांना
  • जालना- कल्याण काळे, विलास अवथडे , संजय लाखेपाटील
  • नांदुरबार- केसी पाडवी, शिरीष नाईक किंवा त्यांच्या पत्नी
  • धुळे- कृणाल पाटील, श्याम सनेर, तुषार शेवाळे
  • कोल्हापूर- शाहू महाराज
  • सांगली- विशाल पाटील
  • सोलापूर- प्रणिती शिंदे
  • पुणे – रवींद्र धंगेकर, अभय छाजेड, मोहन जोशी, अरविंद शिंदे.
  • भिवंडी – दयानंद चोरघे, सुरेश तावरे

 

काँग्रेसने मुंबई सोडून गडचिरोली, भंडारा-गोंदिया, यवतमाळ-वाशीम, चंद्रपूर, हिंगोली, नांदेड, रामटेक,नागपूर , अमरावती अकोला, लातूर , जालना,नांदुरबार, धुळे, कोल्हापूर, सांगली, सोलापूर, पुणे ,भिवंडी या मतदारसंघातील उमेदवारांचा आढावा घेतला. तर उत्तर मध्य मुंबई, उत्तर पश्चिम मुंबई, दक्षिण मध्य मतदारसंघावर काँग्रेसने दावा केला असून त्यावर अजून तोडगा निघायचा आहे.

Latest Posts

Don't Miss