काँग्रेसचं ठरलं!, मुंबई सोडून राज्यात ‘इतक्या’ जागा लढवण्याची काँग्रेसची तयारीत…

लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज्यात अनेक घडामोडींना वेग हा आला आहे. राज्यत कोणती जागा कोण लढवणार अश्या अनेक चर्चाना उधाण आलं आहे.

काँग्रेसचं ठरलं!, मुंबई सोडून राज्यात ‘इतक्या’ जागा लढवण्याची काँग्रेसची तयारीत…

लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज्यात अनेक घडामोडींना वेग हा आला आहे. राज्यत कोणती जागा कोण लढवणार अश्या अनेक चर्चाना उधाण आलं आहे. अश्यातच आता राज्यातील महाविकास आघाडीची (Maha Vikas Aghadi) जागावाटपाची चर्चा अंतिम टप्प्यात आली आहे. तर दिनांक ९ मार्च रोजी उमेदवारांची नाव जाहीर होतील अशी शक्यता देखील मोठ्या प्रमाणात वर्तवली जात आहे. तर काँग्रेस पक्ष देखील चांगलाच ऍक्शन मोड मध्ये आला आहे. उमेदवारांची नाव निश्चित करण्यासाठी आज काँग्रेस निवडणूक समितीची बैठक बोलावण्यात आली आहे.

कोणत्या मतदारसंघात काँग्रेसने कोणाच्या नावाची चाचपणी केली ?

 

काँग्रेसने मुंबई सोडून गडचिरोली, भंडारा-गोंदिया, यवतमाळ-वाशीम, चंद्रपूर, हिंगोली, नांदेड, रामटेक,नागपूर , अमरावती अकोला, लातूर , जालना,नांदुरबार, धुळे, कोल्हापूर, सांगली, सोलापूर, पुणे ,भिवंडी या मतदारसंघातील उमेदवारांचा आढावा घेतला. तर उत्तर मध्य मुंबई, उत्तर पश्चिम मुंबई, दक्षिण मध्य मतदारसंघावर काँग्रेसने दावा केला असून त्यावर अजून तोडगा निघायचा आहे.

Exit mobile version