spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

विजय शिवतारेंनी घेतलेल्या निर्णयामुळे अजित पवार गटातील नेते आक्रमक,अमोल मिटकरींनी दिला मुख्यमंत्र्यांना इशारा

लोकसभा निवडणूका जश्या जश्या जवळ येत आहेत तश्या राजकीय हालचालींना वेग आला आहे.

लोकसभा निवडणूका जश्या जश्या जवळ येत आहेत तश्या राजकीय हालचालींना वेग आला आहे. त्यातच आता शिवसेना शिंदे गटाचे माजी आमदार विजय शिवतारे (Vijay Shivtare) यांनी मोठी घोषणा केली आहे. विजय शिवतारे हे बारामती मतदार संघातून अपक्ष निवडणूक लढवणार असल्याची त्यांनी घोषणा केली आहे. त्यामुळे आता अजित पवार गटातील नेते आक्रमक झाले आहेत. विजय शिवतारे यांनी बारामती मतदारसंघात अडचण निर्माण केल्यास, कल्याण लोकसभा मतदारसंघात (Kalyan Lok Sabha Constituency) अडचण येऊ शकते. तिथे श्रीकांत शिंदे (Shrikant Shinde) उमेदवार असतील,असा थेट इशारा अजित पवार गटाचे नेते अमोल मिटकरी (Amol Mitkari) यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांना दिला आहे.

अमोल मिटकरी म्हणाले, महायुतीचा घटक असताना विजय शिवतारे हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या विरोधात बोलले आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे त्यांना समज देत नसतील. विजय शिवतारे यांच्यामुळे बारामती लोकसभा मतदारसंघात अडचण निर्माण होत असेल तर कल्याण लोकसभा मतदारसंघात अडचण निर्माण होऊ शकते. तिथे श्रीकांत शिंदे उमेदवार असतील. सर्वांनी सर्वांचं सन्मान ठेवला पाहिजे, आम्ही त्याचं पालन करतोय. पण, याचा अर्थ शिवतारेंनी वाचळवीरांसारखं काहीही बडबड करावी हे आम्ही सहन करून घेणार नाही,असे अमोल मिटकरी म्हणाले. विजय शिवतारे हे वादग्रस्त विधान करण्यासाठी प्रसिद्ध व्यक्ती आहेत. म्हणून त्यांच्या वक्तव्याच्या मागे कोणी मास्टरमाइंड असेल असे वाटत नाही. त्यांच्या मागे फक्त त्यांचे सडके मेंदूत असू शकतात, दुसरं कोणी असणार नाही,असे देखील अमोल मिटकरी म्हणाले.

शिवतारे यांनी निवडणूक लढवायची का? हा त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे. लोकशाहीमध्ये सगळ्यांना हा अधिकार आहे. मात्र, महायुतीमध्ये राहून आमच्या वरिष्ठ नेत्यांबद्दल अपशब्द वापरण्याचे सत्र मागील काही दिवसांपासून सुरु आहे, त्याला आमचा तीव्र विरोध आहे. आमचे नेते सुनील तटकरे यांनी याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे देखील कळवले आहे. मुख्यमंत्री शिंदे यांनी देखील त्यांना समज दिली असल्याचे सांगण्यात आले आहे. जनता त्यांना त्यांची जागा दाखवून देईल, असे अमोल मिटकरी म्हणाले.

हे ही वाचा:

आई कुठे काय करते फेम अश्विनी मंहागडेने व्यक्त केली राजकारणात प्रवेश करण्याची इच्छा

१८७ इंटरसेप्टर वाहनांना मुख्यमंत्र्यांनी दाखवला हिरवा झेंडा

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा. 

Latest Posts

Don't Miss