मी तुमच्या घरचं खात नाही, महेंद्र थोरवेंनी केली दादा भुसे यांच्यावर टीका

विधिमंडळ अधिवेशाच्या शेवटच्या दिवशी विधानसभेत सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात चांगलेच वाद झाले आहेत.

मी तुमच्या घरचं खात नाही, महेंद्र थोरवेंनी केली दादा भुसे यांच्यावर टीका

विधिमंडळ अधिवेशाच्या शेवटच्या दिवशी विधानसभेत सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात चांगलेच वाद झाले आहेत. शिवसेना शिंदे गटाच्या आमदारांमध्ये विधानसभेमध्ये धक्काबुकी झाली. राज्यभरात सगळीकडे गुंडगिरी मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. विधानसभेच्या लॉबीत दोन आमदारांमध्ये धक्काबुकी झाल्याने गोंधळ निर्माण झाला. शंभूराज देसाई (Shambhuraj Desai) आणि भारत गोगावले (Bharat Gogawale) यांनी मध्यस्थी करून वाद सोडवले. विधानसभेत कोणताही वाद झाला नाही, असा दावा मंत्री शंभूराज देसाई यांनी केला होता. मात्र त्यांना तोंडावर पडत आमदार महेंद्र थोरवे यांनी (Mahendra Thorve on Dada Bhuse) दादा भुसे यांच्यावर टीका केली आहे.

महेंद्र थोरवे म्हणाले, बाळासाहेबांनी शिकवलं आहे तोंड वाजवून न्याय मिळत नाही तर तोंड मारून न्याय मिळतो. दादा भुसे हे एकदम नकारत्मक मंत्री आहेत. माझ्या मतदार संघात काम होत नाही म्हणून माझ्यावर आवाज चढवला. या कामासाठी त्यांनी मुख्यमंत्री आणि श्रीकांत शिंदे यांना फोन केला होता. आमदारांची कामं होत नसतील तर काय करणार? आम्ही शिवसैनिक आहोत स्वाभिमानी आहोत आम्ही सरपंच नाही तर लाखो लोकांचे प्रतिनिधित्व करतो, असे महेंद्र थोरवे म्हणाले. दादा भुसे यांच्याकडे मी काही कामानिमित्त गेलो होतो. मी याचा पाठपुरावा करत आहे. माझ्या मतदारसंघातील कामाबद्दल मुख्यमंत्र्यांनी सुद्धा दादा भुसे यांना कॉल करून सांगितले होते. श्रीकांत शिंदे यांनासुद्धा कॉल केला होता. पण दादा भुसे यांना सांगून सुद्धा जाणीवपूर्वक काम केलं नाही. आज मी त्यांना त्याबद्दल विचारल्यानंतर दादांनी बाकीच्या लोकांची काम केलं त्यांच्यासाठी मिटिंग घेतली. पण मी सांगूनसुद्धा त्यांनी मिटिंग घेतली नाही, असे महेंद्र थोरवे म्हणाले.

मी त्यांना विचारायला गेल्यानंतर दादा भुसे माझ्यावर चिडून बोलले. आम्ही स्वाभिमानी आमदार आहोत, आम्ही मुख्यमंत्र्यांबरोबर प्रामाणिकपणे आहोत, तुमच्यावर मुख्यमंत्र्यांनी जबाबदारी दिली आहे मंत्री म्हणून, त्यांनी आमदारांची कामे प्रामाणिकपणे त्या ठिकाणी केली पाहिजेत. अशी उत्तर देऊन आम्ही आमचा स्वाभिमान विकणार नाही. त्यामुळे मी त्यांना स्पष्टपणे सांगितलं, मी काही तुमच्या घरी खायला येत नाही. तुम्हाला मी जे काम सांगितलं आहे ते जनतेचं काम आहे. मला माझं काम झालेलं पाहिजे होत. माझ्या मतदारसंघातील काम आहे आणि ते काम तुम्ही त्या ठिकाणी करून द्या, पण तुमची बॉडी लँग्वेज आणि पाहण्याचा दृष्टीकोन वेगळ्या पद्धतीचा होता.म्हणून आमच्यामध्ये थोडी शाब्दिक चकमक झाली असल्याचे महेंद्र थोरवे म्हणाले.

हे ही वाचा:

विधिमंडळाच्या लॉबीमध्ये गोंधळ, शिंदे गटाच्या आमदारांमध्ये धक्काबुकी

Budget Session 2024 : सभागृहात आशिष शेलार आणि भास्कर जाधव यांच्यात हमरीतुमरी…

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version