spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

मला अहमदनगर मतदारसंघातून निवडणूक लढवायचीय- Nilesh Lanke

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आता नेते मंडळींकडून पक्ष बदल करण्याचे सत्र सुरु झाले आहे. १३ मार्च २०२४ रोजी विजय शिवतारे यांनी बारामती मधून अपक्ष म्हणून लढण्याची घोषणा केली. त्यानंतर आता अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे आमदार निलेश लंके हे शरद पवार गटांमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा सगळीकडे पाहायला मिळत आहे. अजित पवार गटाचे निलेश लंके हे शरद पवार गटामध्ये आज चार वाजता पक्षप्रवेश करतील अशी माहिती हाती आली आहे. अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदार संघातून निवडणूक लढवण्यासाठी निलेश लंके यांची इच्छा असून त्यांनी शरद पवार गटात जाण्याचा निर्णय घेतला आहे.

अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदार संघातून निवडणूक लढवण्यासाठी निलेश लंके उत्सुक  असून नुकतीच भाजपची महाराष्ट्रातील लोकसभा उमेदवारांची यादी जाहीर झाली आहे. या यादीनुसार अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदारसंघातून सुजय विखे यांना पुन्हा एकदा उमेदवारी मिळाली आहे. त्यामुळे महायुतीमध्ये निलेश लंके यांना संधी मिळणार नसल्याचे संकेत मिळत आहेत. अशात शरद पवार गटात प्रवेश करून निलेश लंके अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदारसंघातून मैदानात उतरण्याची चर्चा आहे. त्यामुळे आज चार वाजता निलेश लंके हे शरद पवार गटात प्रवेश करतात का हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.

निलेश लंके हे पारनेरचे आमदार आहेत. त्यांना अजित पवार यांचे अत्यंत विश्वासू म्हणून ओळखले जायचे. दक्षिण अहमदनगरमधून (Ahmednagar) ते लोकसभा निवडणुकीसाठी इच्छुक होते. मात्र अजित पवार गटाला ३ किंवा ४ जागा मिळतील अश्या चर्चा सगळीकडे रंगल्या होत्या. त्यामुळे त्यांची चांगलीच अडचण झाली असती. शरद पवार यांची साथ मिळाल्यानंतर ते लोकसभेचे उमेदवार असतील अशा चर्चा सगळीकडे रंगल्या आहेत. लोकनेते लवकर निर्णय घ्या, दक्षिण नगरमध्ये महाराष्ट्राच्या स्वाभिमानाची ‘तुतारी’ वाजवा अशी साद काही दिवसांआधी अमोल कोल्हे यांनी निलेश लंके यांना घातली होती.

हे ही वाचा:

आंबेडकर की ठाकरे? कोणत्या स्थानकाला कोणाचे नाव? | Railway Stations | Mumbai | Balasaheb Thackeray

विजय शिवतारेंनी घेतलेल्या निर्णयामुळे अजित पवार गटातील नेते आक्रमक,अमोल मिटकरींनी दिला मुख्यमंत्र्यांना इशारा

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा. 

Latest Posts

Don't Miss