spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

हिंदुत्वाचा विचार असेल,तर…”; uddhav thackeray यांचे आवाहन

महाविकास आघाडीचे उमेदवार वैशाली दरेकर यांच्यासाठी देखील प्रचार सभेचं आयोजन करण्यात आले होते. आधी मातेचं रक्षण नंतर गोमातेचं असं म्हणत त्या सभेत विरोधकांवर टोला लगावला.

काल १६ मे रोजी ठाणे लोकसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे उमेदवार राजन विचारे(rajan vichare) यांच्यासाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे(uddhav thackeray) यांची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (eknath shinde)  यांच्या बालेकिल्ल्यात प्रचारसभा पार पडली. त्यावेळी त्यांनी महायुतीच्या नेत्यांवर जोरदार टीकास्त्र सोडले. ठाण्यातील भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ कार्यकर्त्यांनी गद्दारांच्या सतरंज्या उचलण्यापेक्षा आमच्याबरोबर यावे, हिंदुत्वाचा झेंडा आपण पुढे घेऊन जाऊ.”असं ठामपणे सांगितले. 

काही दिवसांआधी घाटकोपर येथे दुर्देवी घटना घडली आणि १५ तारखेला मोदींनी भाजपचे इशान्य मुंबईचे उमेदवार मिहिर कोटेचा यांच्या प्रचारासाठी रोड शो चे आयोजन करण्यात आले होते त्यावर”मोदीजी तुम्ही अहंकाराचा शो केलात का?शिवसेनाप्रमुखांनी स्वतःहून शिवसेनेची जबाबदारी माझ्याकडे दिली. मोदीजी, त्यासाठी तुमच्या परवानगीची गरज नाही.”अशा शब्दात पंतप्रधान नरेंद्र मोदी (narendra modi)यांच्यावर घणाघाती टीका केली. 

पुढे ते म्हणाले की, “ठाणे माझ्या शिवसेनेचं आहे. शिवसेनाच्या पदरात विजयाचं पहिलं माप कुणी टाकलं असेल, तर ते माझ्या ठाणेकरांनी टाकलं आहे. अस्सल भाजप कार्यकर्त्यांना सांगतो, तुमचा पक्ष विकणाऱ्यांच्या नादी लागू नका. हिंदुत्वाचा विचार असेल, तर माझ्यासोबत या. आपण हिंदुत्वाचा झेंडा पुढे नेऊ.”असे भाजप कार्यकर्त्यांना ठणकावून सांगितले.

दरम्यान, ‘मोदीजी, भाषण करताना महागाईचा ‘म’ तरी काढतात का?’ असा थेट सवाल उद्धव ठाकरेंनी पंतप्रधानांना विचारला. “उद्याचा दिवस नक्कीच आमचा आहे.विजय सत्याचाच होणार.” हा विश्वासदेखील त्यावेळी त्यांनी व्यक्त केला.तर कल्याण लोकसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे उमेदवार वैशाली दरेकर यांच्यासाठी देखील प्रचार सभेचं आयोजन करण्यात आले होते. आधी मातेचं रक्षण नंतर गोमातेचं असं म्हणत त्या सभेत विरोधकांवर टोला लगावला.

हे ही वाचा:

अजित पवारांच्या अनुपस्थितीवर शरद पवारांचा खुलासा

राहुल गांधी, खरगेंनतर CM Eknath Shinde यांच्याही बॅगांची तपासणी, शिवसेनेत नाराजी

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा. 

Latest Posts

Don't Miss