आपण सरकारमध्ये नसतो तर उन्हाळ्यात पाणी मिळालं नसत- अजित पवार

लोकसभा निवडणुकीच्या तारखा उद्या जाहीर होणार आहेत.

आपण सरकारमध्ये नसतो तर उन्हाळ्यात पाणी मिळालं नसत- अजित पवार

लोकसभा निवडणुकीच्या तारखा उद्या जाहीर होणार आहेत. त्यामुळे सर्वच पक्षांकडून जोरदार प्रचार केला जात आहे. बारामतीच्या निरावागज येथे उपमुख्यमंत्री अजित पवार (Deputy Chief Minister Ajit Pawar) यांच्या सभेचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी बोलताना अजित पवार म्हणाले, बारामतीमध्ये एका माणसाचं नाव सांगा जो दादागिरी करतो, त्याला बघून मी घेतो. सर्वांना सारखा न्याय मिळाला पाहिजे. दादागिरी, गुंडगिरी चालणार नाही. नानाच्या एका ओळखीच्या माणसाला मोक्का लागत होता. माझे सहकारी आले त्यांनी मला सांगितलं आणि म्हणाले दादा तुम्ही मला वाचवा. त्यांना मी म्हणालो एवढ्याच वेळेस परत चुकला तर अजित पवाराकडे यायचे नाही. त्यानंतर मला अधिकारी म्हणाले दादा तुम्ही एवढ कडक का वागतात आणि अशा गोष्टीला कस पाठीशी घालतात? तेव्हा माझापण कमीपणा होतो. पण जीवाभावाची माणसं म्हणून मलाही अडचण होते, असे अजित पवार म्हणाले.

अहिल्याबाईंनी चांगलं काम केलं आहे. त्यांनी कारभार चांगला केला. मुळे अहमदनगर जिल्हा तालुका नाव बदललं आणि अहिल्यानगर नाव दिलं.आपण सरकारमध्ये नसतो तर उन्हाळ्यात पाणी मिळालं नसत,दुष्काळ पडला आहे. अनेक विकास कामे सुरू आहेत. कुठल्या कामाला पैसे मिळाले नाही तर आचारसंहिता संपल्यानंतर पैसे देण्यात येतील. गाय दूध दर वाढ राज्य सरकार देत आहे,दुधात मिक्सिंग दुधात करू नका,असाला पैसा टिकत नसतो,भेसळ युक्त घालू नका, असे आवाहन देखील अजित पवार यांनी केले आहे. यंदा ऊसाचा दर मोदी सरकारने वाढवला आहे. आपल्यावर आयटीची १० हजार कोटी रुपये कर्ज होत. मोदी आणि अमित शाह यांनी साखर कारखान्याचे पैसे कमी केले. रात्री १० वाजायच्या आत सभा संपावयाच्या आहेत. अजून दोन सभा आहेत. नेहमी मला तुम्ही भरभकम पाठींबा दिला. राज्याच्या भल्या करता काही राजकीय निर्णय घ्यावा लागला. मी अनेक वर्षी काम करतोय.काही लोक निवडणूक काळात भाव वाढवून देतात आणि अडचणीत येतात, असे अजित पवार म्हणाले.

पाणी कमी वापरा, ठिबक वापरा,फार बोभाटा करू नका. आपल्या विचारांचं सरकार असल्याने एवढं काम करू शकलो. आपल्याकडे फायनान्स मिनिस्टर आहे म्हणून हे सगळ करू शकलो. बारामती,माळेगाव यांना चांगला निधी मिळवून दिलाय. सोलर पंप साडे आठ लाख पंप देण्याचा विचार सरकार करतोय. यंदाच्या बजेटमध्ये धनगर ओबीसी बहुजन यांना घरे देणार आहोत, असे आश्वासन अजित पवारांनी दिले आहे.

हे ही वाचा:

IPL 2024 : ७ वर्षांनी गौतम गंभीर KKR मध्ये पुनरागमन; चाहत्यांनी केली तुफान गर्दी, सोशल मीडियावर व्हिडिओ होतोय तुफान व्हायरल

इलोक्टोरल बाँड हप्तावसुलीचाच प्रकार, भाजपा सरकारचे स्पष्ट धोरण ‘चंदा दो, धंदा लो’ – जयराम रमेश

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा. 

Exit mobile version