Lok Sabha 2024 : बारामतीत महाविकास आघाडीचा उमेदवार ठरला?, सुप्रिया सुळे – सुनेत्रा पवार आमने सामने?

सध्या राज्याच्या राजकारणात अनेक घडामोडी या घडत आहेत. नुकतंच काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादी हे नाव आणि घड्याळ हे चिन्ह अजित पवार यांच्या गटाला मिळाले आहे.

Lok Sabha 2024 : बारामतीत महाविकास आघाडीचा उमेदवार ठरला?, सुप्रिया सुळे – सुनेत्रा पवार आमने सामने?

सध्या राज्याच्या राजकारणात अनेक घडामोडी या घडत आहेत. नुकतंच काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादी हे नाव आणि घड्याळ हे चिन्ह अजित पवार यांच्या गटाला मिळाले आहे. तर दुसरीकडे लोकसभा निवडणूक तोंडावर आल्या आहेत. या आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच पक्ष हे जोरदार तयारीला लागले आहेत. परंतु सध्या संपूर्ण देशाचे लक्ष हे शरद पवार यांच्या बारामतीकडे लागले आहे. राष्ट्रवादीमध्ये फूट पडल्यानंतर ही पहिली निवडणूक आहे. त्यामुळे बारामतीसाठी नेमके कोण उमेदवार असणार अश्या अनेक चर्चाना सध्या चांगलंच उधाण हे आलं आहे. अश्यातच बारमारती मध्ये महाविकास आघाडीचा कोण उमेदवार असणार या संदर्भात बॅनर्स हे झळकले आहेत.

महाविकास आघाडीत लोकसभा निवडणुकीत कोणत्या पक्षाला किती आणि कोणत्या जागा मिळणार याचा अंतिम निर्णय झाला नाही. पुढील काही दिवसांत याची अधिकृत घोषणा होण्याची शक्यता आहे. अशात बारामती लोकसभा मतदारसंघातून शरद पवार गटाचे उमेदवार म्हणून सुप्रिया सुळे यांना उमेदवारी मिळणार असल्याची जोरदार चर्चा आहे. तर बारामतीमध्ये महाविकास आघाडीचे उमेदवार जाहीर होण्याआधीच उमेदवाराचे बॅनर झळकताना पाहायला मिळत आहे. महाविकास आघाडीचे उमेदवार (Maha Vikas Aghadi Candidate) म्हणून सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांचा उल्लेख करत बारामतीत बॅनर लावण्यात आले आहेत. महाविकास आघाडीचे उमेदवार जाहीर होण्याआधी सुप्रिया सुळे यांचे बॅनर झळकल्याने चर्चेला उधाण आले आहेत. विशेष म्हणजे दोन दिवसांपूर्वी सुप्रिया सुळे यांनी उमेदवारीचे स्टेट्स ठेवले होते आणि त्यानंतर आता थेट त्यांच्या उमेदवारीचे बॅनर झळकताना पाहायला मिळत आहे.

दोन दिवसांपूर्वी स्वतः सुप्रिया सुळे यांनी आपल्या उमेदवारीचा स्टेट्स ठेवला होता. असे असतानाच आता बारामती लोकसभा मतदारसंघात सुप्रिया सुळे यांच्या उमेदवारीचे बॅनर झळकताना पाहायला मिळत आहे. ज्याच्यावर ‘उमेदवारचे नाव सुप्रिया सुळे आणि निशाणी तुतारी फुकंणारा माणूस’ असा उल्लेख करण्यात आला आहे. तसेच याच बॅनरवर शरद पवार, सोनिया गांधी आणि उद्धव ठाकरे यांचे फोटो देखील आहे. तर दुसरीकडे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांची महायुतीकडून बारामती लोकसभेकरिता उमेदवारी जवळपास निश्चित झालीय. सुनेत्रा पवारांनी बारामती लोकसभा मतदारसंघात जनसंपर्क वाढवला असून, काल संत गजानन महाराज प्रगट दिनानिमित्त त्यांनी शहरातील अशोकनगर मंदिरात येऊन दर्शन घेतले. सुनेत्रा पवार यांच्या आधी खासदार सुप्रिया सुळे त्याठिकाणी आल्या होत्या. सुळे यांनी आरतीला हजेरी लावली होती. त्यामुळे आता बारामतीत नेमकं काय राजकारण रंगणार याकडे सर्वांचे लक्ष हे लागले आहे.

हे ही वाचा:

भारतातील पहिल्या अंडरवॉटर मेट्रोचे उद्घाटन नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ६ मार्चला होणार, काय आहे अंडरवॉटर मेट्रोची खासियत

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version