Thursday, July 4, 2024

Latest Posts

Loksabha Election 2024 Result: महाराष्ट्राचा ‘महानिकाल’ Mahavikas Aghadi च्या बाजूने, Mahayuti चे फक्त ‘इतक्या’ जागांवर समाधान

लोकसभा निवडणूक २०२४ चा निकाल (Lok Sabha Election Result 2024) आता स्पष्ट झाला असून महाराष्ट्रात (Maharashtra) महाविकास आघाडीने (Mahavikas Aghadi) चांगले यश प्राप्त झाले असून महायुतीला (Mahayuti) मात्र अपेक्षेपेक्षा कमी जागा मिळवता आल्या आहेत.

Loksabha Election Result 2024: सध्या संपूर्ण देशात लोकसभा (Loksabha Election2 2024) निवडणुकांच वारं हे वाहत आहेत. देशभरात लोकसभेच्या ५४३ जागांसाठी गेल्या महिन्याभरात ७ टप्प्यांमध्ये मतदान पार पडलं. लोकसभा निवडणूक २०२४ चा निकाल (Lok Sabha Election Result 2024) आता स्पष्ट झाला असून महाराष्ट्रात (Maharashtra) महाविकास आघाडीने (Mahavikas Aghadi) चांगले यश प्राप्त झाले असून महायुतीला (Mahayuti) मात्र अपेक्षेपेक्षा कमी जागा मिळवता आल्या आहेत.

महाराष्ट्रात महाविकास आघाडीने घवघवीत यश मिळवले असून ३० जागा आपल्या नावे केल्या आहेत. तर दुसरीकडे महायुतीला १७ जागांवरच विजय मिळवता आला आहे. महाराष्ट्रात काँग्रेस (Congress) हा सर्वाधिक मोठा पक्ष ठरला असून काँग्रेसने १३ जागा जिंकल्या आहेत. शिवसेना उबाठा गटाला (Shivsena UBT) ९ जागा तर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाला (NCP Sharad Pawar) ८ जागा जिंकता आल्या आहेत. महायुतीत भाजपला (BJP) ९ जागा मिळाल्या असून शिवसेना शिंदे गटाला (Shivsena) ७ जागा तर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाला (NCP) केवळ एका जागेवर समाधान मानावे लागले आहे.

देशभरात एनडीए आघाडीने (NDA Alliance) २९४ जागा मिळवून बहुमत प्राप्त केले आहे. तर इंडिया आघाडीला (INDIA Alliance) २३२ जागा जिंकता आल्या आहेत. तर, देशभरात ५४३ लोकसभा मतदारसंघातील सर्वाधिक २४० जागा भाजपने जिंकल्या असून त्याखालोखाल काँग्रेसला ९९ जागांवर विजय मिळवता आला आहे. त्याखालोखाल समाजवादी पक्षाने ३७ जागा तर तृणमूल काँग्रेसने २९ जागांवर बाजी मारली आहे. आता लवकरच सत्तेची समीकरणे कोणती आघाडी उलगडणार आणि देशाचा पंतप्रधान कोण होणार हे स्पष्ट होणार आहे.

लोकसभा निवडणुकांसाठी महाराष्ट्रातील (Maharashtra Lok Sabha Election 2024) ४८ मतदारसंघात पाच टप्प्यात मतदान झालं आहे. २० मे रोजी मुंबईसह एकूण १३ मतदारसंघातील मतदानानंतर राज्यातील निवडणुकांची सांगता झाली. यंदाची राज्याची लोकसभा निवडणूक फार वेगळी ठरली, ती महाराष्ट्रातील राजकीय भूकंपांमुळे. महाराष्ट्रातील शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस या दोन मोठ्या पक्षांमध्ये फूट पडली. शिवसेना आणि राष्ट्रवादी या दोन मोठ्या प्रादेशिक पक्षांमध्ये फूट पडल्यानंतर होणारी ही सगळ्यात मोठी सार्वत्रिक निवडणूक आहे. त्यामुळे महाराष्ट्रासाठी देखील ही निवडणूक चांगलीच चुरशीची झाली. लोकसभा निवडणुकीत पहिल्यांदाच शिवसेना विरुद्ध शिवसेना आणि राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेस अशी लढत पाहायला मिळाली. शिवसेनेतील फुटीमुळे ही लढत उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि एकनाथ शिंदेंसाठी (Eknath Shinde) प्रतिष्ठेची ठरली होती. तर राष्ट्रवादीच्या फुटीमुळे शरद पवार (Sharad Pawar) विरुद्ध अजित पवार (Ajit Pawar) असे चित्र दिसत होते.

हे ही वाचा:

Loksabha Election Result 2024 : एनडीए लागोपाठ तिसऱ्यांदा सरकार बनवणार , PM Modi

Loksabha Election 2024 Result: कोणी मारली बाजी NDA की INDIA आघाडी? कोण करणार सत्ता स्थापन? पहा…

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss