Sunday, July 7, 2024

Latest Posts

Loksabha Election 2024 Result: कोणी मारली बाजी NDA की INDIA आघाडी? कोण करणार सत्ता स्थापन? पहा…

अनेक दिवसांपासून सुरु असलेल्या लोकसभा निवडणुकीची (Loksabha Election 2024) रणधुमाळी काल (मंगळवार, ४ जून) अखेर संपुष्टात आली आहे. १९ एप्रिल रोजी लोकसभा निवडणुकीचं सत्र सुरु झालं आणि ४ जून रोजी महानिवडणुकीचा महानिकाल (Loksabha Election 2024 reult) जाहीर झाला.

अनेक दिवसांपासून सुरु असलेल्या लोकसभा निवडणुकीची (Loksabha Election 2024) रणधुमाळी काल (मंगळवार, ४ जून) अखेर संपुष्टात आली आहे. १९ एप्रिल रोजी लोकसभा निवडणुकीचं सत्र सुरु झालं आणि ४ जून रोजी महानिवडणुकीचा महानिकाल (Loksabha Election 2024 reult) जाहीर झाला. देशातील एकूण ५४३ लोकसभा मतदारसंघामध्ये झालेल्या निवडणुकीत एनडीए आघाडीने (NDA Alliance) सर्वाधिक २९४ जग जिंकल्या तर इंडिया आघाडीला (INDIA Alliance) २३२ जागा जिंकता आल्या. उर्वरित १७ जागा इतर पक्षांनी जिंकल्या. अश्यातच, एनडीए आघाडीला बहुमत प्राप्त झाले असून ते सलग तिसऱ्यांदा सरकार बनवण्याच्या तयारीत आहेत. तर, दुसरीकडे इंडिया आघाडीची आज एक महत्वपूर्ण बैठक होणार असून ते देखील सरकार बनवण्याच्या तयारीत असणार आहेत.

लोकसभेची धामधूम काल संपली असली तरी आता दोन्ही आघाड्यांनी सत्तास्थापनेचा दावा केला आहे. देशभरात सर्वाधिक २४० जागा भाजपने (BJP) जिंकल्या असून त्याखालोखाल काँग्रेसला (Congress) ९९ जागांवर विजय मिळवता आला आहे. त्याखालोखाल समाजवादी पक्षाने (Samajwadi Party) ३७ जागा तर तृणमूल काँग्रेसने (TMC) २९ जागांवर बाजी मारली आहे.

महाराष्ट्रात महाविकास आघाडीने (Mahavikas Aghadi) घवघवीत यश मिळवले असून ३० जागा आपल्या नावे केल्या आहेत. तर दुसरीकडे महायुतीला (Mahayuti) १७ जागांवरच विजय मिळवता आला आहे. महाराष्ट्रात काँग्रेस हा सर्वाधिक मोठा पक्ष ठरला असून काँग्रेसने १३ जागा जिंकल्या आहेत. शिवसेना उबाठा (Shivsena UBT) गटाला ९ जागा तर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाला (NCP Sharad Pawar) ८ जागा जिंकता आल्या आहेत. महायुतीत भाजपला ९ जागा मिळाल्या असून शिवसेना शिंदे गटाला (shivsena) ७ जागा तर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार (NCP) गटाला केवळ एका जागेवर समाधान मानावे लागले आहे.

हे ही वाचा:

Loksabha Election Result 2024 : एनडीए लागोपाठ तिसऱ्यांदा सरकार बनवणार , PM Modi

Kalyan Loksabha Election Result 2024 : दमदार विजयानंतर श्रीकांत शिंदे यांना अश्रू अनावर, अंगभर गुलाल… शब्द अडखळले…

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss