spot_img
Sunday, September 8, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

loksabha election 4th phase voting: महाराष्ट्रात १ वाजेपर्यंत ३०.८५ टक्के मतदान,नंदुरबार मध्ये सर्वांधिक मतदान

सकाळी ७ वाजल्या पासून मतदानाला सुरुवात झाली असून आता दुपारी १ वाजेपर्यंत महाराष्ट्रात ३०.४५ टक्के मतदान पूर्ण झाले आहे. आता पर्यंत कोणत्या मतदारसंघात किती टक्के मतदान झाले आहेत हे पाहुयात.

लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्याचं मतदान (loksabha election 4th phase voting) आज पूर्ण होत आहे. सकाळी ७ वाजल्या पासून मतदानाला सुरुवात झाली असून ९ वाजेपर्यंत ६.४५ टक्के मतदान पूर्ण झाले होते तर सकाळी ११ वाजेपर्यंत १७.५१ टक्के मतदान पूर्ण झाले तर आता दुपारी १ वाजेपर्यंत महाराष्ट्रात ३०.४५ टक्के मतदान पूर्ण झाले आहे. आता पर्यंत कोणत्या मतदारसंघात किती टक्के मतदान झाले आहेत हे पाहुयात.

कोणत्या मतदारसंघात किती टक्के मतदान?

  • बीड – ३३.६५
  • जळगाव – ३१.७०
  • जालना – ३४.४२
  • नंदुरबार – ३७.३३
  • छत्रपती संभाजीनगर – ३२.३७
  • पुणे – २६.४८
  • रावेर- ३२.०२
  • मावळ – २७.१४
  • शिरुर – २६.६२
  • अहमदनगर -२९.४५
  • शिर्डी- ३०.४९

इतक्या टक्के मतदान दुपारी १ वाजेपर्यंत पूर्ण झाले असून नंदूरबार लोकसभा मतदारसंघात ( ३७.३३) सर्वांधिक मतदान झाले आहे तर जालना लोकसभा मतदारसंघात (३४.४२) तर पुणे लोकसभा मतदारसंघात (२६.६२) टक्के कमी मतदान झाले आहे. नंदुरबार लोकसभा मतदारसंघात भाजपकडून हिना गावित (Hina gavit) विरुद्ध महाविकास आघाडीकडून गोवाल पाडवी (Govalpadvi) अशी लढत होणार आहे. भाजपचे मुरलीधर मोहोळ (murlidharmohol)यांच्या विरोधात महाविकास आघाडीचे रविंद्र धंगेकर (ravindra dhangekar)अशी लढत होणार आहे. 

हे ही वाचा:

पराभवाच्या भितीनेच Narendra Modi कडून… Bhalchandra Mungekar यांचे ताशेरे

दिघे साहेबांची नक्कल करून अक्कल येत नसते, ४ जूननंतर कळेल ठाणेकर कोणाच्या बाजूने?Rajan Vichare कडाडले

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा. 

Latest Posts

Don't Miss