Friday, July 5, 2024

Latest Posts

MAHARASHTRA ASSEMBLY MONSOON SESSION 2024 : २०२४-२५ च्या अर्थसंकल्पात महिलांनां मिळाले विशेष स्थान ; शिंदे सरकारने दिली नवी खुशखबर !

हे शिनेसरकारचे शेवटचे बजेट आहे. यात ७६०००कोटी रुपयांचा वाढवण बंदर प्रकल्पाला मंजुरी देण्यात आली आहे. या पावसाळी अधिवेशनात हा अर्थसंकल्प जाहीर करण्यात आला आहे. यात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना जुलै २०२४ रोजी सुरु करणार आहे.

आज विधिमंडळ दुसरा दिवस आहे. त्यामुळे राज्याचा अर्थसंकल्प (budget) जाहीर करण्यात आला. हा अर्थसंकल्प राज्याचे अर्थमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी सादर केला. साधारणतः महिला, शेतकरी व नोकरदार वर्ग अश्या राही वर्गांवर लक्ष करण्यात आले. सोबतच यात अनेक नवनवीन योजना सांगण्यात आल्या आहेत.

ज्यामुळे सर्वसामान्यांना दिलासा मिळू शकतो. हे शिनेसरकारचे (shivasena) शेवटचे बजेट आहे. यात ७६००० कोटी रुपयांचा वाढवण बंदर प्रकल्पाला मंजुरी देण्यात आली आहे. या पावसाळी अधिवेशनात हा अर्थसंकल्प जाहीर करण्यात आला आहे. यात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना जुलै २०२४ रोजी सुरु करणार आहे. राज्य सरकारचा अर्थसंकल्प सादर केला जात आहे.

मुख्यमंत्री अन्नपुर्णा योजना (CM Annapurna Scheme)

राज्याचे अर्थमंत्री अजित पवार हे शिंदे सरकारचा (Shinde Government) अर्थसंकल्प सादर करत आहेत. यावेळी प्रत्येक पात्र कुटुंबाला मोफत तीन गॅस सिलिंडर देण्यात येणार असल्याची घोषणा शिंदे सरकारने केली आहे. महिलांच्या आरोग्याच्या तक्रारी कमी करायच्या असतील तर सुरक्षित इंधन दिलं पाहिजे. एलपीजी गॅस प्रत्येक घराला देण्यासाठी प्रत्येक पात्र कुटुंबाला तीन गॅस सिलिंडर मोफत देणारी मुख्यमंत्री अन्नपूर्ण योजना जाहीर करत आहेत. हि योजना पर्यावरण संरक्षणाला लाभदायक असेल. ५२ लाख १६ हजार ४०० कुटुंबांना लाभ मिळेल. पर्यावरण संरक्षण केलं जाईल. तसेच अंगणवाडी सेविका, मिनी अंगणवाडी सेविका, मदतनीस यांना मृत्यू, सेवा निवृत्ती, राजीनामा या सर्वासाठी १ लाख रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. ६ लाख ४८ हजार महिला बचत गट सध्या कार्यरत आहेत त्यांची संख्या ही ७ लाख करण्यात येणार आहे. बचत गट निधीत १५,००० वरून आता ३०,००० वाढ करण्यात आली आहे. अशी घोषणा अजित पवार यांनी केली आहे.

सामूहिक विवाह योजना :

“शुभमंगल सामूहिक विवाह योजनेतील अनुदान १० हजार होते ते आता २५ हजार करण्यात येणार आहे. स्तन गर्भाशय कर्करोगाच्या निदानासाठी आरोग्य केंद्रात ७८ हजार कोटी उपलब्ध करून देण्यात येणार आहे. जुन्या रुग्णवाहिकांच्या जागी नव्या रुग्णवाहिका देऊ. हर घर नल, हर घर जलसाठी १ कोटी २५ लाख ६६ लाख घरांना नळजोडणी दिली आहे. राहिलेल्या घरांचे काम प्रगतीपथावर आहे,” असंही अजित पवार म्हणाले.

महिला धोरण :

महिलांना केंद्रस्थानी ठेवून आपण प्रगतीची वाटचाल सुरू केली आहे. महिला धोरण आपण जाहीर केले होते. त्यात वेळोवेळी बदल केले. नुकतेच अष्टसुत्री महिला धोरण जाहीर केलं आहे. महिलांना पोषण आहार, रोजगार आणि कौशल्यासाठीच्या योजना राबवणार, लेक लाडकी योजना, जननी सुरक्षा योजना, प्रधानमंत्री मातृयोजना आपण आणल्या. घर खरेदी साठी मुद्रांक शुल्क योजना, नोकरदार महिलांना करातून सूट, शक्ती योजना आदी योजना राबवत आहोत, अशी घोषणा अजित पवार यांनी केली आहे. उमेदमर, ईकॉमर्स प्लॅटफॉर्म उपस्थित करून देणार आहेत. २५ लाख महिलांना लखपती दीदी करण्याचं ध्येय या सरकारच असेल. ‘आई योजना’ यातून १०००० नोकऱ्या उपलब्ध होणार आहेत. 

लाडकी बहीण योजना :

स्त्री समाजाचा केंद्रबिंदू होत आहे. महिला कुटुंब आणि अर्थार्जन अशा दोन्ही पातळीवर महिला काम करत आहेत. मुली परीक्षांमध्ये अव्वल असतात. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आपण घोषित करत आहोत. महिलांचे आर्थिक स्वातंत्र्य स्वावलंबणासाठी २१ ते ६० वयोगटातील पात्र महिलांना दर महा १५०० रुपये देणार आहे. या योजनेसाठी दरवर्षी ४६ हजार कोटी देण्यात येईल. जुलैपासून या योजनेची अंमलबजावणी करण्यात येईल, असं म्हणत अजित पवार यांनी लाडकी बहीण योजनेची घोषणा केली आहे.

हे ही वाचा

MAHARASHTRA ASSEMBLY MONSOON SESSION 2024 : PUNE HIT-AND-RUN या प्रकरणी विधानसभेत फडणवीसांचे भाष्य..

स्टेटबँक ऑफ इंडियाने SBI क्लार्क मेन्स एक्साम चे रिजल्ट जारी..

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss