Saturday, September 7, 2024

Latest Posts

विधिमंडळात झालेल्या गोंधळानंतर मंत्री दादा भुसे यांनी दिली पहिली प्रतिक्रिया

राज्य विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात आज शिंदे गटाचे आमदार दादा भुसे (Dada Bhuse) आणि महेंद्र थोरवे (Mahendra Thorve) यांच्यात धक्काबुकी झाली.

राज्य विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात आज शिंदे गटाचे आमदार दादा भुसे (Dada Bhuse) आणि महेंद्र थोरवे (Mahendra Thorve) यांच्यात धक्काबुकी झाली. अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी राज्याच्या राजकारणात अनेक घडामोडी घडल्या आहेत. त्यामुळे राजकीय चर्चांना उधाण आले आहे. शिंदे गटाचे आमदार मंत्री दादा भुसे आणि महेंद्र थोरवे यांच्यात वाद झाला. त्यामुळे सगळीकडे वातावरण तापले आहे. विधिमंडळात झालेल्या गोंधळानंतर मंत्री दादा भुसे यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे. त्यावर दादा भुसे म्हणाले, महेंद्र थोरवे (Mahendra Thorve) यांच्यासोबत बाचाबाची झाल्याचे बोलले जात आहे, पण असे काही झाले नाही. माझ्या मित्राने मला फोन केला होता.

प्रसारमाध्यमांमध्ये काही बातम्या सुरु आहेत. माझे सहकारी, मित्र महेंद्र थोरवे यांच्यामध्ये विधिमंडळाच्या लॉबीमध्ये काही वाद झाले .थोरवे माझे मित्र, आमच्या पक्षाचे सहकारी आमदार आहेत, असा कुठलाही प्रकार विधिमंडळाच्या लॉबीमध्ये झालेला नाही, या प्रकाराचं मी खंडन करतो. विरोधी पक्षाला सीसीटीव्ही पाहायची असेल तर ते पाहू शकतात. माझी सभागृहाला विनंती आहे की, तुम्ही विधीमंडळातील हाणामारी, अमुक-तमुक काय आहे ते, सीसीटीव्ही फुटेज सदस्यांना दाखवा, असे दादा भुसे म्हणाले. दादा भुसे यांच्याकडे मी काही कामानिमित्त गेलो होतो. मी याचा पाठपुरावा करत आहे. माझ्या मतदारसंघातील कामाबद्दल मुख्यमंत्र्यांनी सुद्धा दादा भुसे यांना कॉल करून सांगितले होते. श्रीकांत शिंदे यांनासुद्धा कॉल केला होता. पण दादा भुसे यांना सांगून सुद्धा त्यांनी काम केलं नाही. आज मी त्यांना त्याबद्दल विचारल्यानंतर दादांनी बाकीच्या लोकांची काम केलं त्यांच्यासाठी मिटिंग घेतली. पण मी सांगूनसुद्धा त्यांनी मिटिंग घेतली नाही, असे महेंद्र थोरवे म्हणाले.

मी त्यांना विचारायला गेल्यानंतर दादा भुसे माझ्यावर चिडून बोलले. आम्ही शिवसेनेचे स्वाभिमानी आमदार आहोत, आम्ही मुख्यमंत्र्यांबरोबर प्रामाणिकपणे राहणार, तुमच्यावर मुख्यमंत्र्यांनी जी जबाबदारी दिली आहे मंत्री म्हणून, त्यांनी आमदारांची कामे प्रामाणिकपणे त्याठिकाणी केली पाहिजेत. अशी उत्तर देऊन आम्ही आमचा स्वाभिमान विकणार नाही. त्यामुळे मी त्यांना स्पष्टपणे सांगितले, मी काही तुमच्या घरी खायला येत नाही. तुम्हाला जे मी काम सांगितलं आहे ते जनतेचं काम आहे. मला माझं काम झालेलं पाहिजे होत. माझ्या मतदारसंघातील काम आहे आणि ते काम तुम्ही त्या ठिकाणी करून द्या, पण तुमची बॉडी लँग्वेज आणि पाहण्याचा दृष्टीकोन वेगळ्या पद्धतीचा होता,असे महेंद्र थोरवे म्हणाले आहेत.

हे ही वाचा:

मी तुमच्या घरचं खात नाही, महेंद्र थोरवेंनी केली दादा भुसे यांच्यावर टीका

काहीतरी काय विचारताय,अधिवेशनाचा विषय आहे त्यावर विचारा; विधानसभेतील गोंधळावर एकनाथ शिंदेनी दिले उत्तर

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss