LOKSABHA ELECTIONS च्या मतदानासाठी मुंबई शहर जिल्हा प्रशासन सज्ज

LOKSABHA ELECTIONS च्या मतदानासाठी मुंबई शहर जिल्हा प्रशासन सज्ज
मुंबई शहर जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवन येथे पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती. मुंबई शहर जिल्ह्यातील ‘३०- मुंबई दक्षिण मध्य’ व ‘३१- मुंबई दक्षिण’ या दोन्ही लोकसभा मतदारसंघांमध्ये लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी सोमवार, २० मे रोजी सकाळी ७ ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत मतदान होणार आहे. मतदानासाठी मुंबई शहर जिल्हा प्रशासनाची सर्व तयारी पूर्ण झाली असून प्रशासन सज्ज आहे. लोकशाहीच्या या उत्सवात जिल्ह्यातील सर्व मतदारांनी उत्स्फूर्तपणे सहभागी होऊन आपल्या मतदानाचा हक्क आवर्जून बजावावा, असे आवाहन मुंबई शहराचे जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी संजय यादव यांनी केले. संजय यादव पुढे म्हणाले की, ‘३०- मुंबई दक्षिण मध्य’ लोकसभा मतदारसंघात १५ उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. तर ‘३१- मुंबई दक्षिण’ लोकसभा मतदार संघात १४ उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. मुंबई शहर जिल्ह्यात ३०-मुंबई दक्षिण मध्य, ३१-मुंबई दक्षिण हे दोन लोकसभा मतदारसंघ आहेत. मुंबई शहर जिल्ह्यात एकूण २४ लाख ९० हजार २३८  मतदार असून २ हजार ५२० मतदान केंद्रे आहेत. जिल्ह्यात सोमवार २० मे रोजी सकाळी ७ ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत मतदान होणार आहे. मंगळवारी ४ जून  रोजी मतमोजणी होणार आहे.

मतदान केंद्रांवर सुविधा उपलब्ध

मुंबई शहर जिल्ह्यात २५२० मतदान केंद्रे आहेत. या सर्व मतदान केंद्रांवर मतदारांसाठी प्रशासनातर्फे सर्व सोयी सुविधा उपलब्ध करून देण्यात येत आहेत. किमान सुविधेची खात्री (Assured Minimum Facilities) अंतर्गत मुंबई शहर जिल्ह्यातील दोन्ही लोकसभा मतदारसंघातील मतदान केंद्रांवर मतदारांसाठी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, मंडप, प्रसाधन गृह, दिव्यांग मतदारांसाठी मार्गिका (Ramps), स्वयंसेवक, व्हीलचेअर्स व विद्युत पुरवठा आदी सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. मतदार माहिती स्लिपचे वाटप सर्व नोंदणीकृत मतदारांना करण्यात आले आहे. लोकसभा निवडणूक-२०२४ च्या अनुषंगाने मुंबई शहर जिल्ह्याअंतर्गत असलेल्या ‘३०-मुंबई दक्षिण मध्य’, ‘३१-मुंबई दक्षिण’ लोकसभा मतदारसंघातील २० मे रोजी होणाऱ्या मतदानासाठी सुमारे १५ हजार अधिकारी व कर्मचारी नियुक्त केले आहेत. मतदान पारदर्शक, नि:पक्षपाती व भयमुक्त वातावरणात होण्यासाठी जिल्हा प्रशासन सज्ज असल्याची माहिती यावेळी श्री. यादव यांनी दिली.

मुंबई शहर जिल्ह्यातील निवडणुकीच्या अनुषंगाने मतदारांची माहिती

१८ ते १९ या वयोगटातील नवमतदार

दिव्यांग मतदार

मतदान केंद्रांची माहिती

हे ही वाचा:

“पंचायत सिझन-३” अखेर कोण जिंकणार निवडणूक ?
घाटकोपरमध्ये रोड शो करून PM Modi यांनी मृतांच्या नातेवाईकांच्या जखमेवर मीठ चोळले: Nana Patole

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा. 

Exit mobile version