spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

अजित पवारांसमोर नवीन संकट? बारामतीत सुप्रिया सुळे – सुनेत्रा पवार यांच्यासह तिसरा खेळाडू मैदानात?

सध्या राज्याच्या राजकारणात अनेक घडामोडी या घडत आहेत. नुकतंच काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादी हे नाव आणि घड्याळ हे चिन्ह अजित पवार यांच्या गटाला मिळाले आहे.

सध्या राज्याच्या राजकारणात अनेक घडामोडी या घडत आहेत. नुकतंच काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादी हे नाव आणि घड्याळ हे चिन्ह अजित पवार यांच्या गटाला मिळाले आहे. तर दुसरीकडे लोकसभा निवडणूक तोंडावर आल्या आहेत. या आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच पक्ष हे जोरदार तयारीला लागले आहेत. परंतु सध्या संपूर्ण देशाचे लक्ष हे शरद पवार यांच्या बारामतीकडे लागले आहे. राष्ट्रवादीमध्ये फूट पडल्यानंतर ही पहिली निवडणूक आहे. महाविकास आघाडी कडून शरद पवार यांच्या कन्या सुप्रिया सुळे यांचं नाव चर्चेत आहेत तर राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांचं नाव चर्चेत आहे. परंतु आता बारामतीच्या या मैदानात तिसरा खेळाडू देखील रिंगणात उतरणारं असल्याची शक्यता वर्वतली जात आहे.

सध्या सगळ्याच लक्ष हे बारामती लोकसभेकडे लागले आहे. अश्यातच आता या लढतीत तिसऱ्या खेळाडूने मैदानात उतरण्याची घोषणा केली आहे. हा खेळाडू म्हणजे माजी मंत्री विजय शिवतारे. विजय शिवतारे यांनी लोकसभेत आरपारची लढाई करण्याचा निर्णय जाहीर केला आहे. त्यामुळे अजित पवार यांच्यासमोर नवीन संकट निर्माण झाले आहे. यावेळी बोलत असताना विजय शिवतारे म्हणाले आहेत की, आपण पवार कुटुंबियांनाच का मतदान करावे. बारामती लोकसभा मतदारसंघ कोणाचा सातबारा नाही, असे वक्तव्य करत विजय शिवतारे यांनी पवार कुटुंबियांवर जोरदार हल्लाबोल केला.

 

राष्ट्रवादीत असलेले आणि नंतर शिवसेनेत गेलेले विजय शिवतारे यांना अजित पवार यांनी आव्हान देऊन २०१९ च्या निवडणुकीत पराभूत केले होते. त्यावेळी विजय शिवतारे यांनी राष्ट्रवादीच्या प्रमुख नेत्यांवर जोरदार टीका करायला सुरूवात केली होती. त्यामुळे अजित पवार आक्रमक झाले होते. त्यांनी शिवतारे यांना चँलेज दिले. अजित पवार म्हणाले होते की, “तुला यंदा दाखवतो तु कसा आमदार होतो ते. महाराष्ट्राला माहितीय मी जर ठरवलं एखाद्याला आमदार होऊ द्यायचे नाही तर मी कुणाच्या बापाला ऐकत नाही.” त्यानंतर २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत अजित पवार यांनी विजय शिवतारे यांचा पराभव केला होता. यामुळे विजय शिवतारे त्या पराभवाचा वाचपा बारामती लोकसभा मतदार संघात काढणार असल्याची राजकीय चर्चा रंगू लागली आहे.

हे ही वाचा:

भाजपाला नितीन गडकरी यांची अडचण होत आहे; अकोल्यातल्या सभेत प्रकाश आंबेडकरांचा गौप्यस्फोट

ऑस्करवर ‘ओपनहायमर’ चित्रपटाने उमटवली मोहोर

डॉ.बाबासाहेबांचे कर्तृत्व हे स्मारकांमध्ये निश्चितच मावणारे नाही- CM Eknath Shinde

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss